महाराष्ट्राच्या उंबरठ्यावर आणखी एक संकट..! कोरोनापेक्षाही जास्त धोकेदायक विषाणू आढळला, पाहा काय होऊ शकते..?
देशात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने थैमान घातले. आता तिसऱ्या लाटेचाही इशारा देण्यात आला आहे. देश कोरोनातून सावरत असतानाच, आणखी एक संकट उंबरठ्यावर उभे ठाकले आहे. विशेष म्हणजे, कोरोनापेक्षाही हे संकट मोठे व धोकेदायक असल्याचे बोलले जाते.
महाबळेश्वरमधील एका गुहेत 2020 मध्ये वटवाघळांच्या दोन प्रजाती आढळून आल्या होत्या. या वटवाघळांमध्ये ‘निपाह’ हा विषाणू आढळून आल्याची माहिती ‘एनआयव्ही’ (National Institute of Virology) यांच्यातर्फे देण्यात आली.
केरळमध्येही यापूर्वी 2018 मध्ये हा विषाणू आढळून आला होता. त्यावेळी केरळमध्ये या विषाणूने मोठे थैमान घातले होते. त्यात अनेकांचा बळी गेला होता. आता कोरोनातून सावरू पाहणाऱ्या महाराष्ट्रापुढे ‘निपाह’ विषाणूचा धोका निर्माण झाला आहे.
कोरोनापेक्षाही ‘निपाह’ विषाणू जास्त धोकेदायक असल्याचे सांगितले जाते. कोरोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूचे प्रमाण 1 ते 2 टक्के आहे. मात्र, निपाहची लागण झालेल्या रुग्णांच्या मृत्यूचे प्रमाण 65 टक्क्यांहून अधिक असल्याची माहिती मिळाली.
महाबळेश्वरच्या गुहेतील दोन प्रजातींच्या वटवाघळांमध्ये ‘निपाह’ विषाणू असल्याचे निष्पन्न झाले आहे. या विषाणूवर कोणतेही औषध वा लस उपलब्ध नाही. त्यामुळे या विषाणूचा प्रसार झाल्यास हाहाकार होण्याची शक्यता आहे.
केरळशिवाय 2001 मध्ये पश्चिम बंगालच्या सिलिगुडीमध्ये, त्याचप्रमाणे 2018-19मध्ये आसाममध्ये ‘निपाह’चे रुग्ण आढळून आले होते. या पार्श्वभूमीवर आतापासूनच दक्षता घेणे आवश्यक आहे.