SpreadIt News | Digital Newspaper

सोन्याच्या भावात उसळी, चांदीची चमकही वाढली, जाणून घ्या आजचे बाजारभाव..!

गेल्या आठवड्यात सराफ बाजारात सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण झाली होती. मात्र, आठवड्याच्या पहिल्या दिवशी आज (सोमवारी) सोन्याला पुन्हा झळाळी आल्याचे दिसले. ‘मल्टी कमोडिटी एक्सचेंज’वर (MCX) आज सोन्याच्या दरात (Gold rates) 0.40 टक्क्यांनी वाढ झाली.

आंतरराष्ट्रीय बाजारातील घडामोडींमुळे गुरुवारी (ता.17) व शुक्रवारी (ता.18) सोन्याचे दर तब्बल 1600 रुपयांनी घसरले होते. तसेच गेल्या महिन्यात ‘गोल्ड ईटीएफ’मधील गुंतवणूकही मोठ्या प्रमाणावर घटल्याचे समोर आले होते.

Advertisement

दरम्यान, आंतरराष्ट्रीय बाजारात तेजी परतल्याचा परिणाम भारतीय सराफा बाजारात आज दिसला. दिल्ली सराफ बाजारात सोन्याचा दरात प्रति तोळा 250 रुपयांची वाढ होताना 46,027 रुपये प्रतितोळा झाला होता. दिल्लीत शुद्ध सोन्याचा नवा भाव प्रति 10 ग्रॅमला 46,277 रुपये होता.

दरम्यान, दिल्ली सराफा बाजारात आज चांदीच्या दरात 258 रुपयांनी वाढ झाली. त्यामुळे चांदीचा भाव आज 66,842 रुपये प्रति किलोवर गेला.

Advertisement

डॉलरला मजबूती व अमेरिकी बॉन्ड यील्डमध्ये झालेल्या घसरणीमुळे सोने दरात तेजी आल्याचे एचडीएफसी सिक्युरिटीजचे (HDFC Securities) सीनियर एनालिस्ट तपन पटेल यांनी सांगितले.

दिल्ली सराफा बाजारात 7 ऑगस्ट 2020 रोजी सोन्याचा दर 57,008 रुपये प्रतितोळा अशा विक्रमी पातळीवर गेला होता. त्याचा विचार केल्यास, सध्याचा दर 10,731 रुपयांनी कमी असल्याचे दिसते. त्यामुळेच सध्याची परिस्थिती सोन्यातील गुंतवणूकीसाठी चांगली असल्याचं जाणकारांचं म्हणणं आहे.

Advertisement

🎯 तमाम महाराष्ट्राला व्हॉट्सॲपवर न्यूज अपडेट्स पुरवणारे ‘स्प्रेडइट – डिजिटल न्यूजपेपर’ नक्की जॉईन करा 👉https://cutt.ly/impnews

Advertisement