नागपूर हादरलं..! एकाच कुटुंबातील पाच जणांची हत्या करून कुटुंबप्रमुखाची आत्महत्या, सासू अन मेहुणीलाही संपविले..!
नागपुरातून एक धक्कादायक बातमी समोर येत आहे. एकाच कुटुंबातील पाच जणांची हत्या करून कुटुंबप्रमुखाने गळफास घेऊन आत्महत्या केली. आलोक माटूळकर, असे या कुटुंबप्रमुखाचे नाव असून, त्याने पत्नी, मुलगी, मुलगा, सासू व मेव्हणीची हत्या केली. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे.
नागपुरातील पाचपावली भागात ही घटना घडली आहे. याबाबत माहिती मिळताच स्थानिक पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत, तपास सुरु केला आहे.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, नागपूरमधील तहसील पोलिस ठाण्याच्या हद्दीत राहणाऱ्या आलोक माथुरकर याने रविवारी (ता.20) रात्री सुरुवातीला पत्नी, मुलगा, मुलीची हत्या केली. नंतर सासरी जाऊन सासू व मेहुणीलाही संपविले. त्यांची हत्या केल्यानंतर पुन्हा तो घरी आला व गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे समोर आले आहे.
दरम्यान, मेहुणीसोबत असलेल्या वादामुळे रागाच्या भरात आलोक याने संपूर्ण कुंटुब संपविल्याचे समोर येत आहे. हा सगळा प्रकार आज (सोमवारी) सकाळी उघडकीस आला. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला. सर्व मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी शासकीय रुग्णालयात पाठवले आहेत.
कौटुंबिक कलहातून ही हत्या झाल्याचा पोलिसांचा प्राथमिक अंदाज आहे. पोलीस याप्रकरणी अधिक तपास करत आहेत.