SpreadIt News | Digital Newspaper

🔯 आजचे राशिभविष्य (Horoscope): तुमचा आजचा दिवस कसा असेल जाणून घ्या..

0

🗓️ रविवार, 20 जून 2021

मेष (Aries) : प्रवासात सामानाची काळजी घ्यावी. पित्त प्रकृतीत वाढ होऊ शकते. निसर्गसौंदर्याचा अनुभव घ्याल.

Advertisement

वृषभ (Taurus) : अघळपघळ बोलणे टाळावे. घरातील टापटि‍पी बाबत दक्ष राहावे. मागचा पुढचा विचार न करता खर्च करू नये.

मिथुन (Gemini) : प्रवासात कसलाही हलगर्जीपणा करू नका. इतरांवर फार विसंबून राहू नका.

Advertisement

कर्क (Cancer) :कामाच्या ठिकाणी दिवस चांगला जाईल. आर्थिक चढ-उतार संभवतात. जवळच्या नातेवाईकांची गाठ पडेल.

सिंह (Leo) : कोणाशीही वाटाघाटी करताना सावध राहावे. जोडीदाराविषयीच्या प्रेम सौख्याला बहार येईल. आपले मत व्यवस्थित पट‍वून द्यावे.

Advertisement

कन्या (Virgo) : तुमच्या मनातील आनंद द्विगुणित होईल. पचनाच्या किरकोळ तक्रारी संभवतात. सहकार्‍यांशी वादाचे प्रसंग येऊ शकतात.

तूळ (Libra) : कामाच्या व्यापाने खचून जाऊ नका. भागीदाराशी संयमाने वागावे लागेल. हितशत्रू पासून सावध राहावे.

Advertisement

वृश्चिक (Scorpio) : प्रयत्नातून नवीन दिशा ठरवाल. वरिष्ठांच्या आदेशाचे काटेकोरपणे पालन करा. तरूणांशी मैत्री वाढेल.

धनु (Sagittarius) : व्यावसायिक आघाडीवर सक्रियता वाढेल. नवीन वाहन घेण्याचा विचार कराल. मुलांकडून चांगल्या बातम्या मिळतील.

Advertisement

मकर (Capricorn) : तुमच्यातील मित्र भावना वाढीस लागेल. प्रत्येक बाबतीत जोडीदाराची उत्तम साथ मिळेल. कष्टाला मागेपुढे पाहू नका.

कुंभ (Aquarius) : कामाच्या बाबत काही महत्त्वाचे निर्णय घ्यावेत. मित्रांशी वादाचे प्रसंग येऊ शकतात.

Advertisement

मीन (Pisces) : व्यवसायात चांगला नफा मिळू शकेल. नवीन तंत्रज्ञानाचा अवलंब करून पाहावा. तुम्ही घेत असलेल्या प्रयत्नात यश येईल.

Advertisement