SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

अवघ्या 28 तासांत 10 मजली इमारत, कुठेही शिफ्ट करता येणार.. पहा कुठे घडलाय हा चमत्कार..?

घर पाहावे बांधून.. अशी एक म्हण आहे. कारण एखादी इमारत बांधताना नाकीनव येतात. अनंत अडचणींचा सामना करताना वर्षानुवर्षे बांधकामे रखडतात. मात्र, एखादी 10 मजली इमारत अवघ्या 28 तासांत तयार झाली, असे सांगितले, तर विश्वास बसणार नाही, पण.. होय इतक्या कमी वेळात ही इमारत तयार झाली आहे.

चीनमधील चांग्शा शहरात ही इमारत उभारल्याचे समोर आले आहे. तेथील ब्रॉड ग्रुप (Broad Group) कंपनीतील कर्मचाऱ्यांनी फक्त 28 तास 45 मिनिटांमध्ये ही 10 मजली इमारत उभी केली. त्याचा व्हिडीओही कंपनीने ‘यू-ट्यूब’वर टाकला आहे.

Advertisement

कंपनीने ही इमारत बांधण्यासाठी ‘प्री फॅब्रीकेटेड कंस्ट्रक्शन सिस्टम’चा वापर केला. म्हणजे, इमारत तयार करताना मॉड्यूलर युनिट्स (Modular Units) एकत्र केले जातात. त्याची निर्मितीही कारखान्यातच होते. हे युनिट्स कंटेनरच्या साहाय्याने कंस्ट्रक्शन साईटवर नेण्यात आले. तेथे ते एकमेकांना जोडण्यात आले. 4 मिनिटे 52 सेकंदाच्या व्हिडीओत हे सगळे पाहायला मिळते.

Advertisement

इतक्या वेगाने तयार झालेल्या इमारतीच्या दर्जाबाबत तुमच्या मनात प्रश्न निर्माण झाला असेल, तर चीनमध्ये सतत भूकंप, महापूर अशी संकटे येत असतात. मात्र, कोणत्याही संकटात ही इमारत सुरक्षित राहणार असल्याचा दावा कंपनीने केला आहे.

सहज शिप्ट करता येणार..!
कंपनीच्या दाव्यानुसार, ही इमारत सहज दुसरीकडे शिफ्ट करता येणार आहे. त्यासाठी फक्त नट-बोल्ट काढणे, नव्या ठिकाणी वीज-पाण्याचे कनेक्शन देणे आवश्यक आहे. इमारतीतील सजावटही खूप सुंदर असून, सोशल मीडियावर ही इमारत मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.

Advertisement

🎯 तमाम महाराष्ट्राला व्हॉट्सॲपवर न्यूज अपडेट्स पुरवणारे ‘स्प्रेडइट – डिजिटल न्यूजपेपर’ नक्की जॉईन करा 👉https://cutt.ly/impnews

Advertisement