SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

पुण्यात मायलेकाची हत्या करुन पतीची आत्महत्या? ‘हे’ पाहून पोलिसही चक्रावले, नेमकं असं काय घडलं?

काही दिवसांपूर्वी पुण्याला हादरा बसवणारी घटना घडली. पुण्यात एका उच्चभ्रू सोसायटीत राहणाऱ्या कुटुंबाच्या मृत्यूची (Pune Murder Case) चर्चा सुरु आहे. त्यांचं पती-पत्नी आणि त्यांचा आठ (8) वर्षांचा मुलगा असे असे अवघे तीन जणांचे कुटुंब होते.

या छोट्याश्या कुटुंबातील हे सर्व जण घरातून पिकनिकला गेले असताना या कुटुंबातील महिला आणि तिच्या मुलाची हत्या करण्यात आली. त्यांचा मृतदेह पुण्यातील वेगवेगळ्या ठिकाणी फेकण्यात आला. त्यानंतर या कुटुंबातील मृतक महिलेच्या पतीचाही मृतदेह शुक्रवारी (18 जून) पोलिसांना खडकवासला धरणाच्या बॅकवॉटरमध्ये (Back Water) सापडला.

Advertisement

आता या सगळ्या प्रकरणावर पुणे पोलिसांचा तपास सुरु असून या तपासात पोलिसांसमोर अनेक प्रश्न उभे राहिले आहेत. पोलिसांना आतापर्यंत मिळालेल्या माहितीनुसार काही तर्क-वितर्क लावले जात आहेत. पण पुरावे मिळाले नसल्याने हाती काही लागले नाही.

गूढ कधी उकलणार..?

Advertisement

माहीती अशी की, पुण्यामध्ये 15 जून रोजी सकाळी सासवड येथे आलिया शेख नावाच्या महिलेचा मृतदेह आढळला. त्यांच्याव धारधार शस्त्राने वार करण्यात Aआले होते. याच घटनेनंतर त्याच दिवशी संध्याकाळच्या वेळेस कात्रजच्या नव्या बोगद्याजवळ आलिया यांच्या आठ वर्षांच्या मुलाचा (अयान शेख) मृतदेह सापडल्याची माहीती मिळाली. पोलिसांच्या तपासात अयानचा गळा दाबून हत्या करण्यात आली हे देखील समोर आलं. पोलिसांच्या तपासानुसार केला असता अयान व त्याची आई हे आबीद शेख (वय 35) सोबत पिकनिकला कारने घराबाहेर पडले होते. आबीद हे आलियांचा पती आणि अयानचे वडील आहेत.

पुण्याच्या धानोरी भागात राहणारं हे कुटुंब कारने पिकनिकला गेले होते. आबीद यांनी पिकनिकसाठी ती कार भाड्याने घेतली होती. पण तीच ब्रिझा कार पुणे-सातारा रस्त्यावर एका चित्रपटागृहासमोर आढळली. कारने प्रवास करणाऱ्या तीन जणांपैकी आलिया व अयान या दोघांचे वेगवेगळ्या ठिकाणी मृतदेह आढळले. त्यानंतर तिसरा व्यक्ती म्हणजेच अयानचे वडील आबीद शेख पुणे-सातारा रोडवर ती गाडी पार्क करतो आणि आबीद हे तेथील सीसीटीव्हीत कैद झाले. ते कार पार्क करताना दिसले व त्यानंतर ते स्वारगेटच्या दिशेने पायी जाताना दिसले, अशी माहिती पोलिसांनी दिली. यानंतर आश्चर्याची बाब ही की, लगेच शुक्रवारी आबीद यांचापण मृतदेह आढळतो आणि एकेक प्रश्न उभे राहतात. आबीद यांचा मृतदेह खडकवासला धरणाच्या बॅकवॉटरमध्ये सापडला. त्यांच्या खिशातील कागदपत्रांमुळे त्यांची ओळख पटणं सोपं झालं.

Advertisement

पोलिसांच्या तपासात महत्वाच्या गोष्टी हाती लागल्या..

शेख दाम्पत्याचा मुलगा अयान याला ऑटिझम हा आजार होता. या मुलाचा सांभाळ करण्यावरुन दोघं पती-पत्नीमध्ये वारंवार वाद व्हायचा, अशी माहिती समोर आली. त्याच वादातून आबीद यांनी स्वत:च्या पत्नी आणि मुलाचा खून केला. त्यानंतर स्वत: आत्महत्या केली, असा अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे. पण आबीद यांचा मृतदेह खानापूर गावाजवळ सापडला. पण या गावाच्या दिशेला सतत वाहतूक सुरु नसते, तिथं जायला गाड्याही सापडत नाहीत. मग आबीद तिथे कसे गेले? असा प्रश्न उपस्थित होतोय. त्याचबरोबर आबीद यांनी आत्महत्या केली की त्यांच्यासोबतही घातपात झाला? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

Advertisement