SpreadIt News | Digital Newspaper

आजचे राशिभविष्य (Horoscope): तुमचा आजचा दिवस कसा असेल जाणून घ्या..

0

शुक्रवार, 18 जून 2021

मेष (Aries) : कौटुंबिक प्रश्नातून मार्ग काढावा. घरी मोठ्या लोकांची ऊठबस राहील. सामाजिक जाणि‍वेतून काम कराल.

Advertisement

वृषभ (Taurus) : नवीन मित्र जोडण्याचा प्रयत्न करावा. घरगुती कामात रमून जाल. इच्छा नसताना प्रवास करावा लागेल.

मिथुन (Gemini) : प्रकृती स्वास्थ्याकडे दुर्लक्ष नको. थोडी चिडचिड कमी करावी. जुन्या गोष्टी मनाला दुखवू शकतात.

Advertisement

कर्क (Cancer) : भौतिक गोष्टींवर अधिक खर्च कराल. शिस्तीचा फार बडगा करून चालणार नाही. मित्रांकडून कौतुक केले जाईल.

सिंह (Leo) : अनावश्यक खर्चावर ताबा ठेवावा. मनात नसत्या शंका आणू नका. विद्यार्थ्यांना अभ्यासात क्षुल्लक अडचणी येऊ शकतात.

Advertisement

कन्या (Virgo) : कौटुंबिक गोष्टीत संयम बाळगावा. जवळच्या प्रवासाचे योग आहेत. व्यवहारातून लाभ संभवतो.

तूळ (Libra) : क्षुल्लक कारणाने नाराज होऊ नका. स्वभावात काहीसा चिडचिडेपणा येईल. वादाच्या मुद्यांपासून दूर राहावे.

Advertisement

वृश्चिक (Scorpio) : मानसिक स्वास्थ्य चांगले राहील. सढळ हाताने मदत कराल. जोडीदाराच्या प्रकृतीची काळजी घ्यावी.

धनु (Sagittarius) : पोटाच्या तक्रारी जाणवू शकतात. कामाच्या ठिकाणी सहकार्य मिळेल. अपुरी कामे पूर्णत्वास जातील.

Advertisement

मकर (Capricorn) : गप्पा मारण्यात वेळ वाया घालवून चालणार नाही. लोकांचा तुमच्याबाबत गैरसमज होऊ शकतो.

कुंभ (Aquarius) : जबाबदारीची जाणीव ठेवून वागावे. कामात सहकार्‍यांची मदत मिळेल. परिस्थितीनुसार कामात काही बदल करावे लागतील.

Advertisement

मीन (Pisces) : मनातील चुकीच्या विचारांना आवर घालावा लागेल. कौटुंबिक सौख्य वृद्धिंगत होईल. नोकरदारांना कामाचा ताण जाणवेल.

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
🎯 तमाम महाराष्ट्राला व्हॉट्सॲपवर न्यूज अपडेट्स पुरवणारे ‘स्प्रेडइट – डिजिटल न्यूजपेपर’ नक्की जॉईन करा 👉https://cutt.ly/impnews

Advertisement