SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

बारावीच्या निकालात दहावी, अकरावीचे गुणही महत्वाचे, कसा लागणार निकाल? जाणून घ्या..

केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाच्या (CBSE) बारावीच्या विद्यार्थ्यांचा निकाल दहावीतील गुण, अकरावीतील गुण आणि बारावीच्या वर्षभरातील कामगिरीच्या आधारे जाहीर करण्यात येणार आहे. केंद्र सरकारने सीबीएसई बोर्डाची बारावीची परीक्षा रद्द केल्यानंतर बोर्डाकडून आता विद्यार्थ्यांचे मूल्यमापन करणारा फॉर्म्युला जाहीर करण्यात आला आहे. सीआयएससी’ईनेही केंद्रीय मंडळाप्रमाणेच निकालाचे सूत्र असल्याचे सांगितले.

मंडळाने निकालाचे सूत्र गुरुवारी सर्वोच्च न्यायालयात सादर केले. सीबीएसई बोर्डाने सर्वोच्च न्यायालयाला सांगितले की..

Advertisement

बोर्डाने ठरवलेल्या क्रायटेरियानुसार, बारावीच्या विद्यार्थ्यांचा निकाल हा दहावी, अकरावी आणि बारावीच्या परीक्षांमध्ये विद्यार्थ्यांना मिळालेल्या गुणांवर आधारित असणार आहे.

यावर्षी 12वी चा निकाल 30:30:40 च्या फॉर्मूल्यावर (30:30:40 Formula) ठरवला जाणार आहे. यात दहावीच्या परीक्षेचे 30 टक्के गुण, अकरावीमधील 30 टक्के गुण आणि बारावीतील 40 टक्के गुणांचा समावेश असणार आहे.

Advertisement

दहावी आणि अकरावी या दोन इयत्तेत वार्षिक परीक्षेत विद्यार्थ्यांना ज्या तीन विषयांत सर्वाधिक गुण मिळाले आहेत, त्याच्या आधारे अंतिम गुण दिले जातील. बारावीच्या वर्षातील युनिट टेस्ट (Unit Test), टर्म (Term) आणि प्रात्यक्षिक (Practical) परीक्षांमध्ये मिळालेले गुण ग्राह्य धरले जातील.

31 जुलैपर्यंत निकाल लागण्याची शक्यता

Advertisement

सुनावणीदरम्यान बोर्डाने सांगितलं की, ठरवलेल्या क्रायटेरियाच्या आधारे जारी निकालाने असंतुष्ट विद्यार्थ्यांना जर परीक्षा द्यायची इच्छा असेल तर त्यांच्यासाठी नंतर वेगळी व्यवस्था केली जाईल. बोर्डाने हे देखील म्हटले आहे की, जर सर्व काही योग्य राहिले तर 31 जुलैपर्यंत रिझल्ट जारी केले जातील.

HSC बोर्ड काय निर्णय घेणार?

Advertisement

केंद्र सरकारने सीबीएसई बारावीची परीक्षा रद्द केल्यानंतर शिक्षण विभागानेही एचएससी बोर्डाची परीक्षा (HSC Board Examination) रद्द करण्याचा प्रस्ताव आपत्ती व्यवस्थापनाकडे दिला. या बैठकीत कोरोनाच्या पार्श्वभूमीवर एचएससी बोर्डाची परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला. राज्य सरकारने एचएससी विद्यार्थ्यांचे मूल्यमापन कसे होणार याबाबत मात्र कोणताही फॉर्म्युला अद्याप जाहीर केलेला नाही.

राज्यातील एचएससी बोर्डाचे अध्यक्ष दिनकर पाटील म्हणाले, “सीबीएसईची मूल्यांकन पद्धती ही एचएससी (HSC) बोर्डापेक्षा वेगळी असते. प्रत्येक बोर्ड स्वायत्त असते. एचएससीच्या विद्यार्थ्यांबाबत अद्याप कोणताही निर्णय घेण्यात आलेला नाही. चर्चा सुरू आहे.”

Advertisement

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
🎯 तमाम महाराष्ट्राला व्हॉट्सॲपवर न्यूज अपडेट्स पुरवणारे ‘स्प्रेडइट – डिजिटल न्यूजपेपर’ नक्की जॉईन करा 👉https://cutt.ly/impnews

Advertisement