SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

सेकंदाला 32 लाखांचे नुकसान, गौतम अदानी जगातील ‘टॉप-15’ श्रीमंतांच्या यादीतून बाहेर..!

भारतातील दुसऱ्या क्रमांकाचे श्रीमंत व्यक्ती, अशी ओळख असणाऱ्या प्रसिद्ध उद्योजक गौतम अदानी यांच्यामागे लागलेले शुक्ल काष्ठ काही केल्या कमी होताना दिसत नाही. या आठवडाभरात अदानी ग्रुपच्या कंपन्यांच्या शेअरमध्ये सातत्याने घसरण होत आहे.

परिणामी, गौतम अदानी यांच्या संपत्तीत मोठ्या प्रमाणात घट झाली आहे. अवघ्या चार दिवसांत त्यांची संपत्ती 15 अरब डॉलर (भारतीय रुपयांत 1.11 लाख कोटी) कमी झाली आहे. प्रत्येक सेकंदाला त्यांना 32 लाखांचे नुकसान होत आहे.

Advertisement

अदानी ग्रुपच्या (Adani Groups) विदेशी फंडाचे अकाउंट ‘फ्रिज’ केल्याने कंपनीच्या शेअरमध्ये सातत्याने घसरण सुरु आहे. त्यामुळे त्यांच्या संपत्तीत सातत्याने घट होत असून, आशियातील श्रीमंतांच्या यादीतील दुसऱ्या क्रमांकावरुनही ते खाली घसरले आहेत.

‘फोर्ब्स’च्या (Forbes) अनुसार, जगातील श्रीमंतांच्या यादीतून 15 व्या स्थानावरून ते आता 18 क्रमांकावर फेकले गेले आहेत. हे असेच सुरु राहिल्यास, ‘टॉप-20’तूनही ते बाहेर पडण्याची शक्यता आहे.

Advertisement

‘फोर्ब्स’ वेबसाइटनुसार गौतम अदानी यांच्या संपत्तीत गुरुवारी (ता.17) 3.6 बिलियन डॉलरचे नुकसान झाले. त्यामुळे त्यांची संपत्ती 62.7 बिलियन डॉलरवर आली. गेल्या शुक्रवारी (ता.11) त्यांची संपत्ती 77 बिलियन डॉलरहून अधिक होती.

या आठवड्यात सोमवारपासून (ता.14) आतापर्यंत 15 अरब डॉलर, म्हणजे 1.11 लाख कोटी रुपयांचे नुकसान झाले आहे. प्रत्येक दिवसाला 28 हजार कोटी, दर तासाला 1160 कोटी, प्रत्येक मिनिटाला 19 कोटी, तर एका सेकंदाला अदानी यांचे 32 लाखांचे नुकसान झाले आहे.

Advertisement

दरम्यान, दुसरीकडे जगात ‘नंबर वन’ स्थान पटकाविण्यासाठी ‘अमेझॉन’चे जेफ बेजोस आणि फ्रान्सचे अरबपती बनार्ड अर्नाल्ट यांच्यात जोरदार रस्सीखेच सुरू असल्याचे दिसत आहे. जेफ बेजोस यांचे ‘नंबर वन’ स्थान धोक्यात आले आहे.

💁🏻‍♀️ आता WhatsApp वर मिळवा ताज्या बातम्या, जॉब अपडेट्स आणि माहिती मनोरंजन🆓 त्यासाठी क्लिक करा 👉 https://cutt.ly/impnews

Advertisement