SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

कोरोनावर ‘2-DG’ भारतीय औषध ठरू शकतं ऑल इन वन औषध, कोरोनाच्या सर्व व्हेरिएंट्सवर गुणकारी?

कोरोना व्हायरसने आपली रूपं (Corona variants) बदलत आहे. कोरोनाचे बरेच व्हेरिएंट्स (Covid variants) संशोधनातून समजले. पण आता या सर्व व्हेरिएंटवर भारताकडे मोठं हत्यार असल्याचं समजतंय.
कोरोना संसर्गावर, कोरोनाच्या सर्व व्हेरिएंट्सवर हे औषध प्रभावी असून, कोव्हिड-19ग्रस्त रुग्णांची ऑक्सिजनची गरज 40 टक्क्यांनी कमी करतं, अशी माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने मागील महिन्यातच दिली होती.

कोरोना व्हायरसवर उपचारासाठी तयार करण्यात आलेलं 2डीजी (2-DG) औषध, कोरोनाच्या सर्व व्हेरिएंट्सशी लढू शकतं. हे औषध कोरोनाच्या व्हेरिएंट्सला रोखतं, तसंच व्हायरसची प्रतिकृती तयार होणंही कमी होतं, असा दावा संशोधकांनी केला आहे.

Advertisement

कोरोनाच्या प्रभावाचा अभ्यास फक्त दोन व्हेरिएंट्सवर करण्यात आला आहे. पण यातील अँटिव्हायरल गुण कोरोनाच्या सर्व व्हेरिएंट्सवर प्रभावी ठरले आहेत, असा दावा संशोधकांनी केला आहे.

2-DG औषध काय आहे ?

Advertisement

या औषधाचं वैद्यकीय भाषेतील नाव आहे 2-deoxy-D-glucose (2 डीऑक्सी-डी-ग्लुकोज) असं आहे. संरक्षण संशोधन आणि विकास संस्थेच्या (DRDO) शास्त्रज्ञांनी डॉ. रेड्डीज लॅबच्या (Dr.Reddy’s Lab) सहकार्याने कोरोनाबाधितांवर उपचार करण्यासाठी 2-डीऑक्सी-डी-ग्लूकोज म्हणजे 2-DG औषध तयार केलं आहे.

DRDO च्या इंन्स्टिट्युट ऑफ न्यूक्लिअर मेडिसीन एंड अलाईड सायन्सेसने डॉ. रेड्डीज लॅब सोबत मिळून तयार केलेलं हे औषध पूर्णत: भारतीय बनावटीचं आहे.

Advertisement

या औषधाला ड्रग्ज कंट्रोलर जनरल ऑफ इंडियाने (डीजीसीआय) 8 मे रोजी या औषधाच्या तातडीच्या वापरास मान्यता दिली. त्यानंतर DCGI ने केंद्रीय आरोग्य मंत्री डॉ. हर्षवर्धन आणि संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी 17 मे रोजी हे औषध लाँच केलं होतं.

केंद्राच्या माहितीनुसार, या औषधाच्या वापराने कोरोनासंक्रमित रुग्णांचा संसर्गातून बरं होण्याचा कालावधी अडीच दिवसांनी कमी झाल्याचं आढळून आलं आहे. हे औषध हॉस्पिटलमध्ये असलेल्या रुग्णांचं आरोग्य लवकरच चांगलं ठेवतं.

Advertisement

संरक्षण मंत्रालयाकडून सांगण्यात आलं की..

क्लिनिकल ट्रायलच्या (clinical trial) निकालानुसार, या औषधामुळे हॉस्पिटलमध्ये असलेले रुग्ण लवकर बरे झाले आहेत. सोबतच हे औषध दिल्याच्या नंतर रुग्णांना खूप वेळ कृत्रिम ऑक्सिजनवर अवलंबून राहण्याची गरज भासली नाही. 2DG देण्यात आलेल्या रुग्णांची आरटीपीसीआर चाचणी (RTPCR TEST) निगेटीव्ह आली. हे औषध विषाणूची लागण झालेल्या पेशींमध्ये जमा होतं आणि विषाणूस शरीरात पसरण्यापासून रोखतं. यानंतर रुग्णाची शक्तीसुद्धा वाढते, असं संरक्षण मंत्रालयाकडून सांगण्यात आले होते.

Advertisement

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
🎯 तमाम महाराष्ट्राला व्हॉट्सॲपवर न्यूज अपडेट्स पुरवणारे ‘स्प्रेडइट – डिजिटल न्यूजपेपर’ नक्की जॉईन करा 👉https://cutt.ly/impnews

Advertisement