SpreadIt News | Digital Newspaper

🔯 आजचे राशिभविष्य (Horoscope): तुमचा आजचा दिवस कसा असेल जाणून घ्या..

0

🗓️ बुधवार, 16 जून 2021

मेष (Aries) : मनाची द्विधावस्था टाळावी लागेल. वादाच्या मुद्द्यापासून चार हात दूर रहा. वरिष्ठांची कौतुकाची थाप पाठीवर पडेल.

Advertisement

वृषभ (Taurus) : कामे अधिक जोमात पार पाडाल. चटकन येणार्‍या रागावर आवर घालावा. पुढील काळासाठी उद्दीष्ट डोळ्यासमोर ठेवा.

मिथुन (Gemini) : जुन्या गोष्टी उकरून काढत बसून नका. सकारात्मक विचारसरणीतून मार्गक्रमण करावे. कफ विकाराचा त्रास संभवतो.

Advertisement

कर्क (Cancer) : पत्नीची व्यवहारकुशलता दिसून येईल. घरातील वातावरण प्रसन्न राहील. कामात वडीलधार्‍यांचे सहकार्य लाभेल.

सिंह (Leo) : अती विचाराने ताण येईल. कौटुंबिक वातावरण शांत ठेवावे. जोडीदाराचा तुमच्यावर प्रभाव राहील.

Advertisement

कन्या (Virgo) : क्षुल्लक गोष्टी मनाला लावून घेऊ नका. ठामपणे निर्णय घेणे गरजेचे आहे. कामातील शिस्त मोडून चालणार नाही.

तूळ (Libra) : दिवसातून कित्येक वेळा संघर्षाची जाणीव होईल. डगमगून जाऊ नका. यश मिळताच सेलिब्रेशन कराल.

Advertisement

वृश्चिक (Scorpio) : कामे पूर्ण करण्यासाठी दिवसभर झटाल. हातातील अधिकार वापरण्याची संधी मिळेल. मानसिक चंचलता जाणवेल.

धनु (Sagittarius) : जामीनकीचे व्यवहार तूर्तास टाळा. खोटे बोलण्याने नुकसान संभवते. रहस्यमय गोष्टी जाणून घ्याव्याशा वाटतील.

Advertisement

मकर (Capricorn) : क्षुल्लक कारणास्तव येणारी निराशा दूर सारावी. प्रतिकूलतेतून वेळेवर मार्ग निघेल.

कुंभ (Aquarius) : बोलण्यातून आत्मविश्वास दाखवाल. मनातील इच्छा हवी तशी पूर्ण होईल. प्रत्येक गोष्टीचा उत्तम प्रकारे आनंद घ्याल.

Advertisement

मीन (Pisces) : आवडते पुस्तक वाचायला मिळेल. इतरांना उदारपणे मदत कराल. सर्वांना आपले मत पट‍वून द्याल.

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
🎯 तमाम महाराष्ट्राला व्हॉट्सॲपवर न्यूज अपडेट्स पुरवणारे ‘स्प्रेडइट – डिजिटल न्यूजपेपर’ नक्की जॉईन करा 👉https://cutt.ly/impnews

Advertisement