SpreadIt News | Digital Newspaper

मराठी हॅकरची कमाल, ‘इन्स्टाग्राम’मधील चुकी काढली, ‘फेसबुक’ने दिले तब्बल इतक्या लाखांचे बक्षिस..!

0

व्हाट्स अँप असो वा फेसबुक की इन्स्टाग्राम.. ही समाजमाध्यम सर्वसामान्य माणसाच्या आयुष्याचा एक भाग झाली आहेत; पण त्यातही काही त्रूटी आहेत. एका मराठी माणसाने ‘फेसबुक’चा प्लॅटफॉर्म असलेल्या ‘इन्स्टाग्राम’मधील (Instagram) गंभीर चूक शोधून काढली. विशेष म्हणजे, फेसबुकनेही चूक मान्य करीत, संबंधित हॅकरचा (hacker) गौरव केला.

मयूर असे या हॅकरचे नाव असून, तो महाराष्ट्राचा रहिवाशी आहे. सामान्यपणे ‘इन्स्टाग्राम’वर एखाद्याचे ‘प्रायव्हेट अकाउंट’ पाहण्यासाठी संबंधितास फॉलो करणे आवश्यक असते. मात्र, ‘इन्स्टाग्राम’मधील एका ‘बग’मुळे (दोष) (Instagram Bug) फॉलो न करताही कोणाचेही ‘प्रायव्हेट अकाउंट’ पाहता येत होतं.

Advertisement

संबंधित अकाउंट्सचे लाईक, कमेंट, सेव्ह काउंट्सही पाहिल्या जाऊ शकत होत्या. ही बाब कम्प्यूटर सायन्सचा विद्यार्थी असणाऱ्या मयूरने फेसबुक (Facebook)च्या निदर्शनास आणून दिली आणि फेसबुकनेही ती मान्य केली.

फेसबुकने तातडीने ‘इन्स्टाग्राम’मधील ही चुकी दुरुस्त केली. विशेष म्हणजे, हा दोष शोधणाऱ्या मयूरला ‘फेसबुक’ने तब्बल 30000 डॉलर (22 लाख रुपये) बक्षिस दिले. तसा ईमेल फेसबुकने मयूरला पाठवला आहे.

Advertisement

‘इन्स्टाग्राम’मधील त्रुटीबाबत मयूरने फेसबुकला 16 एप्रिल रोजीच सांगितलं होतं. त्यावर कंपनीने 15 जूनपर्यंत सोल्युशन शोधलं. समस्या सोडेपर्यंत त्रुटी सांगणाऱ्यांना ही बाब सिक्रेट ठेवण्यास सांगितले होते.

अनेक मोठ्या कंपन्या ‘बग बाउंटी प्रोग्राम’ (दोष शोधणे) ठेवतात. अशा कंपन्यांमधील दोष काढल्यास बक्षिस दिलं जातं. त्रुटी किती गंभीर आहे, ते पाहून बक्षिसाची रक्कम ठरवली जाते. फेसबुकवर बग शोधून बक्षिस मिळवणाऱ्यांमध्ये भारतीय डेव्हलपर किंवा हॅकर्स सर्वात पुढे आहेत.

Advertisement

🎯 तमाम महाराष्ट्राला व्हॉट्सॲपवर न्यूज अपडेट्स पुरवणारे ‘स्प्रेडइट – डिजिटल न्यूजपेपर’ नक्की जॉईन करा 👉https://cutt.ly/impnews

Advertisement