SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

झोपेतून जागं होताना ‘हे’ करा, म्हणजे तुमचं आरोग्य चांगलं राहील..

आपण झोपेतुन उठलो असताना आपल्या शरीराचा प्रत्येक अवयव, स्नायू आराम केल्यामुळे सैल असतात आणि जसे आपण दिनचर्येला सुरुवात करतो वा केल्यामुळे आपण दिवसभराच्या धावपळीत दिवस घालवतो. आपल्या स्नायूंवर अति दबाव (Excessive Pressure on Muscles) आणि ताण येतो. याकरता बेडवरून खाली उतरण्याआधीच काही खास कसरती (Exercise) केल्या तर आपले स्नायू ॲक्टीव्ह होऊन ताण कमी होतो. यामुळे मेंदूला रक्त पुरवठा (Blood Circulation to Brain) सुरळीतपणे व्हायला लागल्यामुळे उत्साही वाटतं.

जाणून घेऊया झोपेतून जागे झाल्यानंतर करावयाच्या स्ट्रेचिंग एक्सरसाईज..

Advertisement

फिगर फोर स्ट्रेच (Figure For Stretch)

आधी बेड किंवा अंथरुणातच सरळ झोपा. आपला उजवा गुडघा दुमडून त्याची टाच नितंबीला स्पर्श करा. आता डावा पाय दुमडवा आणि तो उजव्या गुडघ्यावर ठेवा नंतर उजव्या हातने उजव्या पायाला पडा. आता वरच्या बाजून दुसऱ्या हाताने पडकडा. दोन्ही हातांनी पाय मागे घेण्याचा प्रयत्न करा. पाय छातीपर्यंत नेण्याचा प्रयत्न करा. 10 वेळा श्वासोच्छवास करा. यामुळे कमरेवरचा ताण कमी होतो.

Advertisement

नी-टू चेस्ट स्ट्रेच (Knee To Chest Stretch)

समजा तुम्ही बेडवर झोपलात तर मग सरळ पाय ठेवून ताठ होण्याचा प्रयत्न करा. दोन्ही गुडघे एकमेकांना टेकून दुमडून छातीवर आणण्याचा प्रयत्न करा. दोन्ही हातांनी दोन्ही गुडघे दाबून छातीवर ठेवण्याचा प्रयत्न करा. 10 वेळा श्वास आत-बाहेर करा. नंतर पाय सरळ करा. ही क्रिया सावकाश करायची आहे. यामुळे देखील कमरेवरचा ताण कमी होतो.

Advertisement

बेड टू फ्लोर स्ट्रेच (Bed To Floor Stretch)

तुमच्या बेडच्या कोपऱ्यावर बसा आणि पाय जमिनीवर टेकवा. कमरेत वाकून आपले दोन्ही हात जमिनीवर टेकवा. याच अवस्थेत 5 वेळा श्वासोच्छवास (Inhale-Exhale) करा. असं केल्याने मेंदूला ऑक्सिजन (Oxygen) पुरवठा चांगला होईल आणि त्यामुळे आपल्याला लगेचच उत्साही वाटायला लागेल.

Advertisement

फुल बॉडी स्ट्रेच (Full Body Stretch)

तुम्ही संपूर्ण शरीर स्ट्रेच करण्यासाठी आता पाठीवर सरळ झोपा आणि हळुवारपणे शांत श्वासोच्छवास करा. दोन्ही हाताची बोटं एकमेकांत गुंतवा आणि हात छताकडे म्हणजेच वर करा. हात वरच्या दिशेने खेचण्याचा (स्ट्रेच करण्याचा) प्रयत्न करताना करा. 1 पासून पाचपर्यंत अंक मोजा आणि आधीच्या स्थितीत अशा प्रकारे 3 वेळा एक्सरसाईज करा. यामुळे ताण कमी होऊन आराम मिळेल.

Advertisement

स्पाईन ट्विस्ट (Spine Twist)

जर तुमच्या पाठीचा कणा कमकुवत असेल, तर तुमचं बॉडी पोश्चर देखील बदललं आहे. ही एक्ससाईज या लोकांसाठी फायदेशीर आहे. यामध्ये दोन्ही गुडघे एकमेकांना जोडून उजव्या बाजूला न्या. आता उजव्या हाताने गुडघे उजव्या बाजुला दाबण्याचा तुम्ही प्रयत्न करा. याच वेळेस मान डाव्या बाजूला वळवण्याचा प्रयत्न करा. 10 वेळा श्वासोच्छवास करा.

Advertisement

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
🎯 तमाम महाराष्ट्राला व्हॉट्सॲपवर न्यूज अपडेट्स पुरवणारे ‘स्प्रेडइट – डिजिटल न्यूजपेपर’ नक्की जॉईन करा 👉https://cutt.ly/impnews

Advertisement