SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

अदानी समूह सावरला, शेअर बाजारात पुन्हा तेजी, पाहा कोणत्या शेअरमध्ये झालीय वाढ..?

पत्रकार सुचेता दलाल यांच्या ट्विटनंतर कालचा (ता.14) दिवस शेअर बाजारासाठी, त्यातही विशेषतः अदानी ग्रुपसाठी (Adani Group) ‘ब्लॅक डे’ ठरला होता. अदानी समूहातील गुंतवणूकदारांवरील कारवाईने भांडवली बाजारात (Share Market) खळबळ उडाली. त्यातून सावरताना आज (मंगळवारी) सेन्सेक्स (Sensex) व निफ्टीत (Nifty) तेजी दिसली. अदानी समूहाचे शेअरही सावरले.

नॅशनल सिक्युरिटीज डिपॉझिटरी लिमिटेडने अदानी समुहाच्या चार कंपन्यांमध्ये हिस्सा ठेवणार्‍या तीन विदेशी फंडची खाती गोठवली होती. त्याचा परिणाम कालच्या (सोमवारी) शेअर बाजारातही दिसला. अदाणी समूहाचे सर्व सहा सूचीबद्ध कंपन्यांचे शेअर्स कोसळले. त्यात गुंतवणुकदारांचे माेठे नुकसान झाले.

Advertisement

दरम्यान, आज सकाळच्या सत्रात अदानी पोर्ट, अदानी ग्रीन, अदानी एन्टरप्रायजेसचे शेअर पुन्हा वधारण्यास सुरुवात झाली. मिडकॅप (Mid cap) आणि स्मॉल कॅपला (Small cap)देखील मागणी होती.

सेन्सेक्सच्या 30 पैकी 29 शेअरमध्ये वाढ झाली. इंडसइंड बँक, एशियन पेंट, कोटक बँक, भारती एअरटेल, बजाज फायनान्स, ओएनजीसी, एसबीआय, बजाज ऑटो, टीसीएस, आयटीसी, एक्सिस बँक, एचडीएफसी, रिलायन्स शेअरमध्ये तेजी दिसून आली.

Advertisement

मुंबई शेअर बाजाराचा सेन्सेक्स 265 अंकांनी वधारला असून, तो 52812 अंकावर होता. राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी 67 अंकांनी वधारुन 15878 अंकावर पोचला. दोन्ही निर्देशांक सार्वकालीन उच्चांकी स्तरावर आहेत.

आज (मंगळवारी) सकाळी बाजार उघडताच गुंतवणूकदारांनी खरेदीवर भर दिला. सेन्सेक्स 250 अंकांनी वधारला, तर निफ्टीत 75 अंकांची वाढ झाली. भांडवली बाजारात सेन्सेक्स आणि निफ्टीने सकारात्मक सुरुवात केली होती.

Advertisement

🎯 तमाम महाराष्ट्राला व्हॉट्सॲपवर न्यूज अपडेट्स पुरवणारे ‘स्प्रेडइट – डिजिटल न्यूजपेपर’ नक्की जॉईन करा 👉https://cutt.ly/impnews

Advertisement