SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

‘टेस्टमध्ये पहिला बॉल खेळायला नको रे बाबा..!’ पाहा काय म्हणतोय ‘हा’ भारतीय ‘बॅट्समन’..!

टीम इंडिया येत्या 18 जूनपासून कप्तान विराट कोहली याच्या नेतृत्वाखाली ‘वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप’ची फायनल खेळणार आहे. न्यूझीलंड संघाने नुकताच इंग्लंड संघाचा धुव्वा उडवून टीम इंडियाला एकप्रकारे इशाराच दिला आहे. दुसरीकडे टेस्ट मॅच तोंडावर असताना, एक भारतीय फलंदाज चक्क ‘मी नाही खेळणार पहिला बॉल..’ असे म्हणतोय..

इंग्लंडमधील साऊथम्पटनमध्ये होणाऱ्या या मॅचमध्ये भारतीय फलंदाजांची ‘कसोटी’ लागणार आहे. कारण, साऊथम्पटनमधील ‘पीच’ स्विंग बॉलिंगला मदतगार ठरणार आहे. त्यामुळे भारतीय सलामीवीर रोहित शर्मा आणि शुभमन गिल यांच्यासमोर मोठे आव्हान असेल.

Advertisement

आपल्या छोट्याशा आंतरराष्ट्रीय कारकिर्दीत शुभमनने आपल्या खेळीने अनेकांना प्रभावित केले आहे. मात्र, या कसोटीत त्याला न्यूझीलंडचे फास्ट बॉलर ट्रेंट बोल्ट आणि टीम साऊदी यांचा सामना करावा लागणार आहे.

शुभमनच्या खेळीवरच टीम इंडियाची सुरुवात अवलंबून असेल. दुसरीकडे शुभमन मात्र पहिला बॉल खेळण्यास उत्सुक नाही. आपल्या टेस्ट कारकिर्दीत फक्त एकदाच शुभमनने पहिल्या बॉलचा सामना केलाय.

Advertisement

अहमदाबाद येथे इंग्लंड विरुद्ध झालेल्या टेस्टमध्ये तो पहिला बॉल खेळला होता. मात्र, जेम्स अँडरसनने त्याला पहिल्याच ओव्हरमध्ये ‘इनस्विंगर’वर LBW आउट केले. त्या इनिंगमध्ये त्याला खातेही उघडता आले नव्हते. तेव्हापासून शुभमनने पहिल्या बॉलचा धसका घेतल्याचे दिसत आहे.

पुन्हा असं होणार नाही..!
‘द ग्रेड क्रिकेटर शो’ला दिलेल्या मुलाखतीत शुभमन म्हणाला, “इंग्लंड विरुद्ध इनिंगच्या सुरुवातीला मी पहिला बॉल खेळतो, असे स्वत:च रोहित शर्माला सांगितले होते. मी तसे का केले, मला नाही माहित; पण त्यावेळी मी तिसऱ्या की चौथ्या बॉलवर शुन्यावरच आऊट झालो. आता पुन्हा असं होणार नाही.”

Advertisement

🎯 तमाम महाराष्ट्राला व्हॉट्सॲपवर न्यूज अपडेट्स पुरवणारे ‘स्प्रेडइट – डिजिटल न्यूजपेपर’ नक्की जॉईन करा 👉https://cutt.ly/impnews

Advertisement