SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

सरकारी कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर! ‘या’ महिन्यात मिळणार 18 महिन्यांपासून रखडलेला महागाई भत्ता..

आता सरकारी कर्मचाऱ्यांचा (Government employee) महागाई भत्ता (Dearness Allowance) येत्या जुलै महिन्यात मिळण्याची चिन्हं आहेत. 18 महिन्यांपासून रखडलेला हा महागाई भत्ता मिळण्याचा मार्ग मोकळा होणार आहे. हा भत्ता 17 टक्क्याऐवजी आता 28 टक्के मिळणार आहे.

आता केंद्रीय कर्मचार्‍यांची संस्था नॅशनल काउंसिल ऑफ जॉइंट कंसल्टेटिव मशीनरी (JCM) यांची 26 जून रोजी बैठक होणार आहे आणि यामध्ये चांगला निर्णय होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. कोरोना महामारीमुळे (Corona) केंद्र सरकारने सरकारी कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता रोखला होता.

Advertisement

सरकारने 1 जानेवारी 2020 आणि 1 जुलै 2020 हे दोन्ही महागाई भत्ते दिले नाहीत. त्यात यावर्षाचीही भर पडली. या बैठकीत, महागाई भत्त्यावर अंतिम निर्णय होईल. यानंतर जुलैच्या पगारामध्ये महागाई भत्ता जोडून कर्मचाऱ्यांचे पगार देण्यात येईल. म्हणून कर्मचाऱ्यांचे एकूण तीन हप्ते यायचे आहेत. या कर्मचार्‍यांना तीन हप्त्यांचे पैसे आता एकाच वेळी देण्यात येणार आहेत.

तसेच, जुलैमध्ये केंद्रीय कर्मचार्‍यांना पगाराची मोठी रक्कम मिळणार या आणि त्याचबरोबर मागील 18 महिन्यांपासून थांबलेला डीए देखील देण्यात येईल. यानंतर कर्मचार्‍यांचा 17 टक्के असणारा महागाई भत्ता 28 टक्के होणार आहे.

Advertisement

7 व्या वेतन आयोगांतर्गत (7th Pay Commission) केंद्रीय कर्मचार्‍यांचे किमान वेतन 18 हजार रुपये आहे. यामध्ये 15 टक्के महागाई भत्ता म्हणून ही रक्कम जोडणे अपेक्षित आहे. अर्थातच या कर्मचाऱ्यांना दरमहा 27 हजार रुपये पगार मिळेल. म्हणजेच वर्षाचा विचार केला तर, केंद्रीय कर्मचार्‍यांना डीएमध्ये 32 हजार 400 रुपयांचा एकूण लाभ मिळेल.

मिळालेल्या माहीतीनुसार…

Advertisement

जून 2021 मधील महागाई भत्ता जरासा उशीरा होणार आहे आणि त्यात 4 टक्क्यांनी वाढ होऊ शकते, असाही अंदाज आहे. हे ऑक्टोबरपर्यंत दिले जाऊ शकते, मग त्यावेळी महागाई भत्ता 32 टक्के असू शकतो.

त्याचबरोबर गेल्या 18 महिन्यांपासूनच्या डीएची थकबाकी देय देण्याची मागणी कर्मचारी संघटनेने केली आहे. JCM चे नॅशनल कॉन्सिल शिवगोपाल मिश्रा यांनी दिलेल्या माहितीनुसार लेव्हल -1 मधील कर्मचार्‍यांचे डीए (DA) थकबाकी 11 हजार 800 पासून ते 37 हजार 554 रुपये आहे.

Advertisement

लेव्हल -13 किंवा लेव्हल-14 च्या कर्मचाऱ्यांच्या डीएची गणना केली, तर कर्मचार्‍यांच्या हाती 1 लाख 44 हजार 200 रुपये ते 2 लाख 18 हजार 200 रुपये पर्यंत येऊ शकतात.

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
🎯 तमाम महाराष्ट्राला व्हॉट्सॲपवर न्यूज अपडेट्स पुरवणारे ‘स्प्रेडइट – डिजिटल न्यूजपेपर’ नक्की जॉईन करा 👉https://cutt.ly/impnews

Advertisement