SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

मोठी बॅटरी असणारे चार बेस्ट बजेटमध्ये असणारे स्मार्टफोन; किंमत 8 हजारांपेक्षाही कमी, वाचा सविस्तर..

भारतीय बाजारपेठेत मोठ्या बॅटरीच्या स्मार्टफोनची मागणी वाढत आहे. याचा अर्थ असाही आहे की, लोकांना बॅकअप तर हवाच पण गेमिंग स्मार्टफोन आणि उत्तम प्रोसेसरही हवाच! मग ही कमी आता जे कोणी पूर्ण करणार त्या स्मार्टफोनची मागणी जास्त वाढेल. त्यासोबत बजेटमध्ये (Smartphone under 10,000) असला की मग झालंच! असे फिचर देणाऱ्या कंपन्या शाओमी, व्हिवो, ओप्पो (Xiaomi, Vivo, Oppo) सारख्या स्मार्टफोन कंपन्या व इतर काही कंपन्या कमी किमतीत जंबो बॅटरी देतात.

मग पाहा बजेट स्मार्टफोन आणि त्यांची किंमत..

Advertisement

Gionee Max: जिओनीच्या जिओनी मॅक्स स्मार्टफोनमध्ये 6.1 इंचचा डिस्प्ले, 2 जीबी रॅम आणि 32 जीबी स्टोरेज आहे. कॅमेरा 13 एमपी प्रायमरी आणि 5 एमपीचा सेल्फी कॅमेरा देण्यात आला आहे. तसेच 5000 mAh बॅटरी देण्यात आली आहे. या मोबाईलची किंमत 5499 रु. आहे.

Infinix Smart HD 2021: इन्फिनिक्स स्मार्ट एचडी 2021 या स्मार्टफोनमध्ये (Smartphone) 5000 एमएएच पॉवरची बॅटरी आहे. 6.1 इंचचा आयपीएस एचडी + डिस्प्ले आहे. यात MediaTek Helio A20 प्रोसेसर आहे. या स्मार्टफोनमध्ये 2 जीबी रॅम व 32 जीबी मेमरी आहे. 8 एमपी सिंगल रियर कॅमेरा आणि 5 एमपी फ्रंट कॅमेरा मिळेल. या मोबाईलची किंमत 6499 रु. आहे.

Advertisement

Poco C3: पोकोचा ‘पोको सी 3’ स्मार्टफोन हा जम्बो बॅटरीसाठी ओळखला जातो. यात Mediatek Helio G35 प्रोसेसर आहे. 6.53 इंचचा एचडी + डिस्प्ले असणाऱ्या या स्मार्टफोनमध्ये 13 एमपी प्रायमरी सेन्सर, दुसरा 2 एमपी मॅक्रो लेन्स व तिसरा 2 एमपी डेप्थ सेन्सर आहे. या स्मार्टफोनमध्ये 5 एमपीचा फ्रंट कॅमेरा (Camera) देण्यात आला आहे. महत्वाचं म्हणजे 5000 mAh बॅटरी आहे, जी 10W फास्ट चार्जिंग सपोर्ट (Fast Charging Support) करते. याची किंमत फक्त 7499 रु. आहे.

Realme C21: अल्पावधीतच अनेक सीरिज काढून ही कंपनी बाजारात विक्री करून आपला वाटा वाढवत आहे. रीअलमी सी 21 मध्ये 6.5 इंचचा एचडी प्लस एलसीडी डिस्प्ले मिळतो. 3 जीबी रॅम व 32 जीबी इंटर्नल स्टोरेज देण्यात आले आहेत. यात Mediatek Helio G35 प्रोसेसर आहे. 5000 mAh बॅटरी या स्मार्टफोनमध्ये देण्यात आली आहे. जी 10W फास्ट चार्जिंग सपोर्ट करते. 13 एमपी प्रायमरी कॅमेरा सेन्सर, 2 एमपी मॅक्रो लेन्स व 2 एमपी मोनोक्रोम लेन्स दिल्या आहेत. या स्मार्टफोनमध्ये दर्जेदार अनुभवासाठी फ्रंटला 5 एमपीचा सेल्फी कॅमेरा (Selfie Camera) देण्यात आला आहे. याची किंमत फक्त 7999 रु. आहे.

Advertisement

महत्वाचं: या स्मार्टफोनच्या किंमती वाचकांसाठी ई-कॉमर्स साईट्सवरून घेण्याचा योग्य प्रयत्न केला आहे. यात कंपनीच्या ऑफर्सनुसार क्वचित फरक असू शकतो.

Advertisement