SpreadIt News | Digital Newspaper

रविवारची सुटी ‘या’ मराठी माणसामुळे मिळाली..! त्यासाठी करावा लागलाय मोठा संघर्ष, पाहा त्याची ही रंजक कहाणी..!

0

रविवारची सुट्टी म्हणजे ‘फुल्ल टू धम्माल..’ आठवडाभराच्या कामाच्या व्यापातून बाहेर पडून विश्रांती घेण्याचा, कुटूंबासोबत दोन क्षण घालविण्याचा दिवस. या एका दिवसाच्या आरामानंतर ‘चार्ज’ होऊन काही जण नव्या जोमाने दुसऱ्या दिवशी कामावर हजर होतात.

संपूर्ण आठवडाभर लोक या एका दिवसाची वाट पाहत असतात. पण, तुम्ही एन्जॉय करता, ती ‘रविवारची सुटी’ सहज मिळालेली नाही. त्यामागे मोठा संघर्ष आहे. हा संघर्ष कोणी केलाय माहितीय का, तर एका मराठी माणसाने..! चला तर मग रविवारच्या सुटीमागील रंजक कहाणी जाणून घेऊ या..!

Advertisement

भारतावर ब्रिटीशांचं राज्य असताना, लोकांवर मोठ्या प्रमाणात अत्याचार होत होते. कामगारांना सातही दिवस विनासुट्टी काम करावं लागत असे. त्याला एका मराठी माणसाने पहिल्यांदा विरोध केला.. या मराठी माणसाचे नाव होते, नारायण मेघाजी लोखंडे..!

कामगार नेते असणाऱ्या लोखंडे यांनी आठवड्यातुन एक दिवस कामगारांना सुटी देण्याची मागणी ब्रिटीशांकडे केली. अर्थातच सुरुवातीला ब्रिटीश सरकारने त्यांची मागणी फेटाळून लावली. पण लोखंडे शांत बसणाऱ्यांतील नव्हते. त्यांनी कामगारांसोबत मिळून ब्रिटीश सरकारविरोधात आवाज उठवला.

Advertisement

जवळपास सात वर्षे हा संघर्ष सुरू होता. अखेर इंग्रज सरकार नमलं नि 10 जून 1890 रोजी रविवारी कामगारांना एक दिवस सूटी देण्याचा निर्णय झाला. सोबतच रोज दुपारी अर्धा तास विश्रांती घेण्याचीही सूट मिळाली. लोखंडे यांच्यामुळेच रविवारची सुटी, शिवाय ऑफिसमध्ये ‘क्षणभर विश्रांती’ घेण्याची संधी मिळाली..!

🎯 तमाम महाराष्ट्राला व्हॉट्सॲपवर न्यूज अपडेट्स पुरवणारे ‘स्प्रेडइट – डिजिटल न्यूजपेपर’ नक्की जॉईन करा 👉https://cutt.ly/impnews

Advertisement