Take a fresh look at your lifestyle.

एका नाण्याची किंमत ‘फक्त’ 138 कोटी रुपये..! लिलावात लागली बोली, नाण्याची खासियत जाणून घेण्यासाठी वाचा..!

0

अनेकांना दुर्मिळ नाणी, नोटा, वस्तूंचा संग्रह करण्याचा छंद असतो. या छंदातूनच एक जण मालामाल झाला. एका दुर्मिळ नाण्यापोटी त्याला थोडे-थिडके नव्हे, तर तब्बल 138 कोटी रुपये मिळाले.

अचंबित करणारा हा प्रकार अमेरिकेत घडला आहे. अमेरिकेत नुकताच दुर्मिळ नाण्यांचा लिलाव झाला. त्यात एक दुर्मिळ नाणं 18.9 मिलीयन, म्हणजेच भारतीय रुपयांनुसार तब्बल 138 कोटी रुपयांना विकले गेले. विशेष म्हणजे, या नाण्याच्या लिलावासाठी ठेवलेल्या तिकीटातून 60 कोटी रुपये जमा झाले.

Advertisement

असं आहे नाणं..!
पूर्णपणे सोन्याचं असलेलं हे नाणं 1933 सालातील आहे. नाण्याच्या एका बाजूला गरुडाचे चित्र आहे, तर दुसऱ्या बाजूला ‘लिबर्टी’चे (Liberty) चिन्ह आहे. त्याची मूळ किंमत 20 डॉलर, (Dollar) म्हणजे केवळ 1400 रुपये होती. लिलावात हे नाणे तब्बल 139 कोटी रुपयांना विकले गेले.

तज्ज्ञांच्या मते, हे नाणे अमेरिकेत प्रचलित सोन्याच्या नाण्यांमधील शेवटचे नाणे आहे. त्यामुळे त्याचे मूल्य वाढले. लिलावापूर्वी हे नाणे 73 ते 100 कोटी रुपयांपर्यंत विकले जाण्याची शक्यता व्यक्त होत होती. पण, अखेर हे नाणं 138 कोटी रुपयांना विकले गेले.

Advertisement

अमेरिकेतील ‘शू डिझायनर’ आणि कलेक्टर स्टुअर्ट विट्जमॅन यांच्याकडे हे नाणे होते. स्टुअर्ट विट्जमॅन यांना लहानपणापासूनच नाणी, शिक्के जमविण्याचा छंद आहे. त्यांनी 2002 मध्ये सुमारे 55 कोटी रुपयांना ते विकत घेतले होते.

🎯 तमाम महाराष्ट्राला व्हॉट्सॲपवर न्यूज अपडेट्स पुरवणारे ‘स्प्रेडइट – डिजिटल न्यूजपेपर’ नक्की जॉईन करा 👉https://cutt.ly/impnews

Advertisement

Leave a Reply