SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

श्रीलंका दौऱ्यासाठी भारतीय संघाची घोषणा: आयपीएल गाजवणाऱ्या ‘या’ खेळाडूंना संधी!

भारतीय क्रिकेट कंट्रोल बोर्डाने (BCCI) श्रीलंका दौऱ्यासाठी टीम इंडियाची घोषणा (Team India Sqaud For Sri Lanka Tour) केली आहे. या दौऱ्यात टीम इंडियाचं नेतृत्व शिखर धवन करणार आहे तर भुवनेश्वर कुमारला उपकर्णधार केलं आहे.

श्रीलंका दौरा सुरु असताना भारतीय कसोटी संघ इंग्लंड दौऱ्यावर असणार आहे. भारताला 18 ते 22 जून दरम्यान कसोटी अजिंक्यपद स्पर्धेचा अंतिम सामना न्यूझीलंड विरुद्ध खेळायचा आहे. त्यानंतर 4 ऑगस्टपासून इंग्लंडविरुद्ध 5 सामन्यांची कसोटी मालिकाही त्यांना इंग्लंडमध्ये खेळायची आहे.

Advertisement

सामने कधी होणार?

भारताचे श्रीलंकेसोबतचे सामने सोनी स्पोर्ट्स नेटवर्कवर पाहता येणार आहेत. भारताचा वरिष्ठ संघ सध्या इंग्लंड (England) दौऱ्यावर असून जुलै महिन्यात श्रीलंकेमध्ये 13 ते 25 जुलै दरम्यान तीन वनडे मॅच तर तीन टी20 मॅच खेळणार आहे. 13, 16 आणि 18 जुलै रोजी एकदिवसीय (ODI) तर  21, 23 आणि 25 जुलै रोजी टी 20 सामने खेळले जाणार आहेत. कोरोनाचे संकट पाहता सर्व सामने कोलंबोच्या प्रेमदासा स्टेडियमवर खेळले जातील, अशी माहीती आहे.

Advertisement

श्रीलंका दौऱ्यात ‘या’ खेळाडूंना संधी..

श्रीलंका दौऱ्यासाठी टीम इंडियात फलंदाजांमध्ये: पृथ्वी शॉ, शिखर धवन, मनीष पांडे, नितीश राणा, देवदत्त पडिकल, ऋतुराज गायकवाड, सूर्यकुमार यादव, इशान किशन आणि संजू सॅमसनला संधी मिळाली आहे.

Advertisement

श्रीलंका दौऱ्यासाठी टीम इंडियात ऑलराउंडर: हार्दिक पांड्या, क्रुणाल पांड्या आणि कृष्णप्पा गौतम यांनाही सामना फिरवण्यासाठी संघात स्थान दिलं आहे.

श्रीलंका दौऱ्यासाठी टीम इंडियात गोलंदाजांमध्ये: दीपक चहर, युजवेंद्र चहल, भुवनेश्वर कुमार, चेतन सकारिया, नवदीप सैनी, वरुण चक्रवर्ती, कुलदीप यादव, राहुल चहर आणि यांनाही चमक दाखवण्याची संधी मिळाली आहे.

Advertisement

नवोदित खेळाडूंना संधी: भारतीय संघामध्ये आयपीएलमध्ये (IPL) चमकलेल्या मराठमोळ्या ऋतुराज गायकवाडसह वेगवान गोलंदाज चेतन सकारिया, नितीश राणा, देवदत्त पडिकल आणि कृष्णप्पा गौतम यांचा पहिल्यांदाच टीम इंडियात समावेश केला गेला आहे. यापैकी पहिल्या सामन्यासाठी ‘अंतिम 11’ मध्ये कोणाचा समावेश होईल त्यांना संधीचं सोनं करायची वेळ आहे व टीम इंडियामध्ये स्थान पक्के करण्याचीही!

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
🎯 तमाम महाराष्ट्राला व्हॉट्सॲपवर न्यूज अपडेट्स पुरवणारे ‘स्प्रेडइट – डिजिटल न्यूजपेपर’ नक्की जॉईन करा 👉https://cutt.ly/impnews

Advertisement