SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

‘बिटकॉइन’ला ‘या’ देशाने दिली मान्यता, पाहा त्याचा काय परिणाम झालाय..?

‘क्रिप्टोकरन्सी’ अर्थात आभासी चलन. क्रिप्टोकरन्सीचे (cryptocurrency) अनेक प्रकार असले, तरी त्यातील ‘बिटकाॅईन’ (Bitcoin)मध्ये जगात सर्वाधिक प्रमाणात गुंतवणूक होते. मात्र, ‘टेस्ला’ (Tesla) कंपनीचे सहसंस्थापक एलन मस्क यांच्या ट्विटमुळे ‘बिटकॉइन’चे भाव गडगडले होते.

जगातील अनेक देशांनी ‘बिटकॉइन’मधील गुंतवणुकीला मनाई केलेली आहे. काहींनी ‘बिटकॉईन’शी संबंधित नियमावली आणखी कठोर केली. मस्क यांच्या ट्विटनंतर तर ‘बिटकॉईन’मध्ये गुंतवणूक करणारे गुंतवणूकदार मे महिन्यात चांगलेच होरपळून निघाले. बिटकॉईनचा भाव 33 हजार डॉलरपर्यंत खाली आला होता.

Advertisement

‘बिटकॉईन’सह सर्वच आभासी चलनांच्या अस्तित्वावर प्रश्न निर्माण झाला असताना महत्वाची घडामोड घडली. मध्य अमेरिकेतील ‘अल् साल्वाडोर’ (el salvador) या देशाने ‘बिटकॉईन’ला कायदेशीर मान्यता दिली. आभासी चलनाला कायदेशीर चलन घोषीत करणारा ‘अल् साल्वाडोर’ पहिलाच देश ठरला आहे.

‘अल् साल्वाडोर’च्या संसदेने ‘बिटकॉईन’ला कायदेशीर मान्यता देण्याचा प्रस्ताव 62 च्या तुलनेत 84 मतांनी मंजूर केला. त्यानंतर ‘बिटकॉईन’मध्ये 13.60 टक्के वाढ झाली. बिटकॉईनचे मूल्य 37182.49 डॉलरवर गेले.

Advertisement

तसेच, ‘इथर’ (ether cryptocurrency) या आभासी चलनाच्या मूल्यातही 5.27 टक्के वाढ झाली. त्याची किंमत 2566.40 डॉलरवर गेली. तर ‘बिनन्स कॉइन’ (binance crypto) या ‘क्रिप्टोकरन्सी’च्या किमतीत 10 टक्के वाढ झाली. एकंदरीत ‘अल् साल्वाडोर’च्या एका निर्णयामुळे ‘क्रिप्टोकरन्सी’ मार्केटला ‘अच्छे दिन’ आले आहेत.

🎯 तमाम महाराष्ट्राला व्हॉट्सॲपवर न्यूज अपडेट्स पुरवणारे ‘स्प्रेडइट – डिजिटल न्यूजपेपर’ नक्की जॉईन करा 👉https://cutt.ly/impnews

Advertisement