SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

जास्त ॲव्हरेज देणाऱ्या व परवडणाऱ्या देशातील टॉप 5 गाड्या कोणत्या माहीत करून घ्या..

पेट्रोल-डिझेलच्या किंमतीत सतत वाढ झाल्याचं आपल्याला रोजच समजतं. आजच्या काळात बर्‍याच कंपन्या उत्कृष्ट ॲव्हरेज असलेल्या बाईक विकत आहेत. आपण अगदी कमी किंमतीत बेस्ट ॲव्हरेज असलेली बाईक खरेदी करायचं ठरवलं असेल, तर मग वाचा कोणत्या बाईक्स उपलब्ध आहेत.

बजाज सिटी 100: पहिल्या नंबरवर येते ती बजाजची बेस्ट सेलिंग बाईक सीटी 100 ॲव्हरेजच्या बाबतीत ही बाईक पहिल्या क्रमांकावर असून ती 104 किलोमीटर प्रतिलिटर ॲव्हरेज देते, अशी कंपनी म्हणते. पण वापरानंतर ती 90 किलोमीटरपर्यंत ॲव्हरेज देते. याची दिल्लीची एक शोरूम किंमत 49,152 रुपये आहे.

Advertisement

बजाज प्लॅटिना 110: Bajaj Platina 110 ही बजाजची बाईक सर्वात लोकप्रिय बाईकपैकी एक आहे. यात 110cc चे एअर कूल्ड इंजिन आहे. याची किंमत 65,000 रुपयांच्या आसपास आहे आणि ही बाईक 84 किलोमीटर प्रतिलीटर ॲव्हरेज देते.

टिव्हिएस स्टार सिटी प्लस: टिव्हिएस स्टार सिटी प्लस (TVS Star City Plus) या 110 सीसी इंजिनच्या दुचाकीची दिल्ली एक शोरूम किंमत 66,000 रुपयांच्या आसपास आहे. पिकअप या दुचाकीला चांगला आहे. कंपनीच्या म्हणण्यानुसार, ही दुचाकी 85 किमी ॲव्हरेज देते.

Advertisement

सुपर स्प्लेंडर: यानंतर हिरो मोटोकॉर्पची सुपर स्प्लेंडर (Super Splendor) ही दुचाकी (Bike) येते. या दुचाकीला 85 किमी ॲव्हरेज असल्याचं कंपनी सांगते, पण आपल्या वापरानुसार 70-75 किमी पर्यंत ॲव्हरेज देते. या बाईकची किंमत 70,000 रुपयांच्या जवळपास आहे.

स्प्लेंडर प्लस- देशातील सर्वाधिक विकली जाणारी हिरो मोटोकॉर्पची हिरो स्प्लेंडर प्लस (Splendor Plus) ही दुचाकी (Bike) आहे. या ही बाईक 80 किमी ॲव्हरेज देते, असं कंपनीनं म्हटलंय. पण ही सामान्यांसाठी अतिशय फायदेशीर अशी ही दुचाकी तिच्या वापरानुसार 72 किमीपर्यंत ॲव्हरेज देऊ शकते. या दुचाकीची दिल्ली एक्स शोरूम किंमत 62,000 रुपये आहे, अशी माहिती आहे.

Advertisement

पेट्रोलचे भाव वाढताय, म्हणून ॲव्हरेजही गरजेचं!

प्रत्येक दिवशी सकाळी 6 वाजता पेट्रोल आणि डिझेलच्या (Petrol & Diesel) किंमतीत बदल होतो. त्यामुळे सकाळी 6 वाजल्यापासून पेट्रोल-डिझेलचे नवे दर लागू केले जातात. या मध्ये एक्साइज ड्युटी, डिलर कमीशन आणि अन्य गोष्टींचा समावेश करुन पेट्रोल-डिझेलचे दर जवळजवळ दुप्पट होतात. म्हणून बरेच जण कमी किंमतीत जास्त ॲव्हरेज देणाऱ्या दुचाकी घेतात. पैसे जर वाचत असले आणि आपला वापरही जास्त असेल आणि ॲव्हरेजही हवंय, तर मग विचार करायला हरकत नाही.

Advertisement

महत्वाचं!: हे लक्षात ठेवा की, येथे नमूद केलेले दर एक्स-शोरूम दिल्लीचे आहेत आणि त्यांच्या ॲव्हरेजची आहे. आम्ही वाचकांसाठी प्रयत्न करून अहवालाच्या आधारे योग्य माहीती देत आहोत. म्हणून ॲव्हरेज ड्रायव्हिंगची स्टाइल आणि रोड कंडिशननुसार व बाईकची किंमत वापरानुसार बदलू शकते.

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
🎯 तमाम महाराष्ट्राला व्हॉट्सॲपवर न्यूज अपडेट्स पुरवणारे ‘स्प्रेडइट – डिजिटल न्यूजपेपर’ नक्की जॉईन करा 👉https://cutt.ly/impnews

Advertisement