SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

‘ऑन ड्युटी रोमान्स’ पोलिस जोडप्याच्या अंगलट, ‘डीसीपी’कडून जोडपे ‘सस्पेंड’, पहा नेमकं काय झालं..?

कोरोनाशी लढाई लढतानाच पोलिसांना ‘सदरक्षणाय खलनिग्रहणालय’साठी अधिक वेळ काम करावं लागत आहे. सततच्या टेन्शनमधून बाहेर पडण्यासाठी ड्युटीतून दोन क्षण काढून काही पोलिस आपला छंद जोपासतात. मात्र, दिल्ली पोलिस दलातील एका जोडप्याला ही ‘क्षणभर विश्रांती’ चांगलीच महागात पडली.

दिल्ली पोलिस दलातील हे जोडपं लॉकडाउन ड्युटीवर असताना, पोलिस गणवेशात त्यांनी ‘टुकूर टुकूर देखते हो क्या..’ या गाण्यावर डान्स केला. मोबाईलमध्ये त्याचे शूटिंग केले. त्यानंतर त्यांनी हा व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला.

Advertisement

पाहता पाहता हा व्हिडीओ समाज माध्यमात मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला. काहींनी या जोडप्याचे कौतुक केलं, तर काहींनी टीका..! अखेर या जोडप्याच्या डान्सचा व्हिडीओ दिल्ली पोलिस प्रशासनापर्यंत पोहचला.

Advertisement

‘ऑन ड्युटी रोमान्स’ केल्याबद्दल या जोडप्याला पोलिस उपायुक्त (DCP) उषा रंगानी यांनी अधिकृत नोटिस बजावली. ड्युटीवर असताना असा व्हिडीओ का शूट केला, याबाबत खुलासा करण्यात यावा, असे नोटिशीत म्हटले आहे. शिवाय काही दिवसांसाठी या जोडप्याला कामावरुन ‘सस्पेंड’ही करण्यात आले आहे.

Advertisement

दरम्यान, वरिष्ठ पोलिसांनी केलेल्या या कारवाईवरुन समाज माध्यमात दोन गट पडले आहेत. ‘ऑन ड्यूटी रोमान्स’ करणाऱ्या या जोडप्यावर केलेली कारवाई योग्यच असल्याचे काहींचे म्हणणे आहे. तर काहींनी या कारवाईबाबत नाराजीही व्यक्त केली आहे.

🎯 तमाम महाराष्ट्राला व्हॉट्सॲपवर न्यूज अपडेट्स पुरवणारे ‘स्प्रेडइट – डिजिटल न्यूजपेपर’ नक्की जॉईन करा 👉https://cutt.ly/impnews

Advertisement