SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

ब्रेकिंग: दहावीच्या विद्यार्थ्यांचा निकाल कधी लागणार? गुण कसे मिळणार, जाणून घ्या..

कोरोना महामारीमुळे शाळा, कॉलेज (Schools, Colleges) बंद असताना ऑनलाईन वर्ग भरले. या पार्श्वभूमीवर परिस्थिती पाहून दहावीची परीक्षा रद्द झाली मात्र निकालाशिवाय तर पुढच्या वर्गात कसं जाणार, हा प्रश्न विद्यार्थ्यांना नक्कीच पडलेला असणार आहे. म्हणून निकाल (10th Result) नेमकं कशा पद्धतीने जाहीर होणार याकडे विद्यार्थी व पालकांचे लक्ष लागून होते.

म्हणून सरकारनेच या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या (Maharashtra State Board of Secondary & Higher Secondary Education) दहावीचा निकाल जाहीर करण्यासाठी त्या संदर्भातील कार्यपद्धती जाहीर केली आहे.

Advertisement

’10वी’ च्या निकालाबाबतचं मूल्यमापन ‘असं’ असणार..

10वी (10th) च्या निकालाबाबतच्या मूल्यमापनामध्ये इयत्ता नववीचा अंतिम निकाल, इयत्ता दहावीच्या वर्षभरामधील लेखी मूल्यमापन व इयत्ता दहावीचे अंतिम तोंडी/प्रात्याक्षिक/अंतर्गत मूल्यमापन या दोन्हींच्या आधारे 10वी च्या विद्यार्थ्यांना विषयानुसार गुण देण्यात येणार आहे.

Advertisement

यानुसार या मूल्यमानामध्ये इयत्ता नववीतील 100 पैकी 50 गुण तर दहावीतील 80 पैकी 30 गुण हे ग्राह्य धरण्यात येणार आहेत. दहावीच्या विद्यार्थ्यांची अंतर्गत मूल्यमापन करण्याची प्रक्रिया आज 10 जूनपासून सुरू होणार आहे.

अंतर्गत मूल्यांकनाच्या आधारे शाळेतील अनेक विद्यार्थ्यांना चांगले गुण मिळणार आहेत. त्याचवेळी हुशार विद्यार्थ्यांची नववीतील कामगिरी चांगली नसल्यास त्याचा फटका दहावीच्या निकालात बसणार आहे. या फॉर्म्युल्यामुळे शाळेतील अनेकांना उत्तम गुण मिळण्याची शक्यता आहे.

Advertisement

निकाल कधी लागणार?

दहावीचा निकाल कधी लागेल, याची उत्सुकताही जवळपास सर्वांनाच आहे. राज्यातील दहावीच्या विद्यार्थ्यांचा निकाल जाहीर करण्याच्या प्रक्रियेचे राज्य मंडळाने वेळापत्रक जाहीर केले आहे. त्यानुसार जुलैमध्ये दहावीचा निकाल जाहीर होण्याची शक्यता आहे. या वेळापत्रकानुसार दहावीच्या मूल्यमापनाचा कार्यक्रम 10 जून ते 3 जुलैपर्यंत चालणार असून त्यानंतर जुलैमध्ये निकाल जाहीर होण्याची शक्यता आहे.

Advertisement

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
🎯 तमाम महाराष्ट्राला व्हॉट्सॲपवर न्यूज अपडेट्स पुरवणारे ‘स्प्रेडइट – डिजिटल न्यूजपेपर’ नक्की जॉईन करा 👉https://cutt.ly/impnews

Advertisement