SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

धोनीच्या टीममधील ‘हा’ खेळाडू झालाय ‘गझनी’, नवीन लूकमधील फोटो व्हायरल..!

कोरोनामुळे ‘आयपीएल’ मध्येच बंद करण्याची वेळ आली. त्यानंतर टीम इंडियाचे टेस्टचे खेळाडू इंग्लंडला रवाना झाले, तर अन्य खेळाडू घरी कुटुंबासोबत वेळ घालवत आहेत.

घरी बसून असलेल्या या खेळाडूंना लॉकडाऊनमुळे क्रिकेटचा सरावही करता येत नाही. त्यामुळे सध्या हे खेळाडू सोशल मीडियावर ‘ऍक्टिव्ह’ झाल्याचे दिसत आहे. काही खेळाडूंच्या ‘हेअर स्टाईल’ची नेहमीच चर्चा होते. त्यात आता आणखी एका खेळाडूचा समावेश झाला आहे.

Advertisement

या खेळाडूचे नाव आहे, दीपक चाहर. महेंद्रसिंग धोनीच्या चेन्नई सुपर किंग्स टीममधील या फास्ट बॉलरने त्याची ‘हेअर स्टाईल’ चेंज केली आहे. दिपकने ‘गजनी स्टाईल’मध्ये आपली हेअर स्टाईल केली आहे. त्याने या बदललेल्या लूकमधील एक फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे.

 

Advertisement
View this post on Instagram

 

A post shared by Deepak Chahar (@deepak_chahar9)

Advertisement

दीपकचा हा फोटो पाहून अनेक फॅन्सना आमिर खानच्या ‘गझनी’ चित्रपटाची आठवण झाली. क्रिकेट फॅन्समध्ये दीपकचा हा फोटो चांगलाच ‘व्हायरल’ झालाय. ‘नवीन लुक पैकी कोणता फोटो तुम्हाला आवडला? मी नक्की ठरवू शकत नाही. त्यामुळे दोन्ही फोटो टाकत आहे,’ असं कॅप्शन दीपकनं दिले आहे.

Advertisement

महेंद्रसिंह धोनीची पत्नी साक्षी धोनीला देखील दीपकचा हा फोटो आवडला. ‘खतरनाक लुक दीपक’ अशी प्रतिक्रिया साक्षीने या फोटोवर दिली आहे.

यंदाची ‘आयपीएल’ स्थगित होण्यापूर्वी दीपकने ‘सीएसके’साठी चांगली कामगिरी केली होती. त्यामुळेच त्याची श्रीलंका दौऱ्यावर टीममध्ये निवड निश्चित मानली जात आहे. भारत विरुद्ध श्रीलंका यांच्यात 13 जुलै ते 25 जुलै दरम्यान 3 वन-डे आणि 3 टी 20 सामन्यांची मालिका होणार आहे.

Advertisement

🎯 तमाम महाराष्ट्राला व्हॉट्सॲपवर न्यूज अपडेट्स पुरवणारे ‘स्प्रेडइट – डिजिटल न्यूजपेपर’ नक्की जॉईन करा 👉https://cutt.ly/impnews

Advertisement