SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

कोरोना लसीची किंमत ठरली, आता खासगी रूग्णालयात लस किती रुपयांना ? वाचा..

कोरोनाने देशात नव्हे तर जगात थैमान मांडल्यानंतर आता हळूहळू काही देश अनलॉक होत आहेत. भारतात दुसऱ्या लाटेनंतर आता पुन्हा एकदा विस्कळीत जनजीवन सुरळीत होत आहे. या परिस्थितीत बहुतेक जणांची ओढ ही कोरोना प्रतिबंधात्मक लस घेण्याकडे आहे.

आरोग्य मंत्रालयाने खासगी रूग्णालयात कोरोना व्हॅक्सीनचे दर ठरवले आहेत. तसेच अशीही माहीती आहे की, सरकार आता कोरोना प्रतिबंधात्मक लसीवर जीएसटी (GST) आकारत आहे.

Advertisement

खासगी रुग्णालयाला ठरवून दिलेले दर

कोविशील्ड (Covishield) लसीचा दर हा प्रत्येकी एका डोससाठी 780 रुपये आहे. कोव्हॅक्सीनचा (Covaxin) दर हा प्रत्येकी एका डोससाठी 1410 रुपये आहे. तर स्पूटनिक-व्ही (Sputnik-V) चा दर हा प्रत्येकी एका डोससाठी 1145 रुपये आहे.

Advertisement

सरकारने कोरोनावर असणाऱ्या प्रतिबंधात्मक लसीवर जीएसटी आकारत आहे. एका व्हॅक्सीनसाठी 5% जीएसटी आकारला जाणार आहे. सोबतच प्रत्येक डोसवर 150 रुपये प्रति डोस (150 rs. Per Dose) सेवा शुल्क आकारणार आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घोषणा केली आहे की, 21 जूनपासून सर्व राज्यात मोफत कोरोना प्रतिबंधात्मक लस मिळणार आहे. आरोग्य मंत्रालयाने आपल्या पत्रकार परिषदेत 74 कोटी लसीची ऑर्डर जाहीर केली आहे.
केंद्र सरकारने मंगळवारी माहिती दिली की, कोविशिल्ड आणि कोवॅक्सिन लसीचे 44 कोटी लसींच्या डोसची ऑर्डर दिली आहेत. यामध्ये 25 कोटी कोविशील्ड आणि 19 कोटी कोवॅक्सीनच्या डोसचा समावेश आहे.

Advertisement

केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने म्हटले आहे की, कोविड लसींचे 44 कोटी डोस ऑगस्ट ते डिसेंबर दरम्यान उत्पादक पुरवतील. तसेच आता ई-बायोलॉजिकल लिमिटेडच्या ( E-Biological Limited) लसीचे 30 कोटी डोस खरेदी करण्यासाठी आदेश दिले आहेत, जे सप्टेंबरपर्यंत उपलब्ध होतील. या कंपन्यांची ऑर्डर 30 टक्के रक्कम आधी देऊन केली आहे.

लसीकरणाच्या नव्या गाईडलाइन्सवर (Guidlines) वीके पॉल यांनी सांगितलं की, ‘गाईडलाइनमध्ये 75% लस केंद्र प्रोक्योर करणार आहे. राज्यांना मोफत लस दिली जाणार आहे. एक दिवस आधी पंतप्रधान नरेंद्र मोदी (Prime Minister Narendra Modi) यांनीही घोषणा करत सांगितलं होतं की, 18 वर्षांपेक्षा जास्त (18+) वयाच्या लोकांना मोफत लस (Free Corona Vaccine) उपलब्ध करुन देण्यात येणार आहे.

Advertisement

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
🎯 तमाम महाराष्ट्राला व्हॉट्सॲपवर न्यूज अपडेट्स पुरवणारे ‘स्प्रेडइट – डिजिटल न्यूजपेपर’ नक्की जॉईन करा 👉https://cutt.ly/impnews

Advertisement