SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

न्यूझीलंडमधील ‘ऑकलंड’ ठरलेय सर्वाधिक राहण्यायोग्य शहर.. पहा ही जगातील ‘टॉप टेन’ शहरांची यादी..!

माणसाला नेहमीच शांत, निवांत ठिकाणी राहायला आवडते. सध्याच्या कोविड महामारीच्या काळात तर माणूस गर्दीपासून दूर पळतो आहे.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लंडनमधील ‘दी इकॉनॉमिस्ट ग्रुप’च्या (The Economist Group) ‘दी इकॉनॉमिस्ट इंटेलेजींस युनिट’ (The Economist Intelligence Unit) तर्फे जगातील सर्वाधिक राहण्यायोग्य ठिकाणांचा सर्व्हे करण्यात आला. त्यातून जगातील ‘टॉप टेन’ (Top Ten) राहण्यायोग्य शहरे निवडण्यात आली. या शहराची यादी नुकतीच जाहीर करण्यात आली आहे.

Advertisement

कोविडवर नियंत्रण मिळविण्यात जर कोणत्या देशाने यश मिळवले असेल, तर तो देश आहे न्यूझीलंड. त्यामुळे साहजिकच या देशातील ऑकलंड या शहराने या यादीत पहिल्या क्रमांकावर स्थान मिळवले आहे. याशिवाय न्यूझिलंडमधीलच वेलिंग्टन हे शहर या यादीत चौथ्या क्रमांकावर आहे.

इकॉनॉमिस्ट इंटेलेजींस युनिटच्या यादीत दुसऱ्या क्रमांकावरील शहर आहे, जपानमधील ‘ओसाका’. कोरोना महामारीवर विजय मिळविण्यात जपानलाही मोठ्या प्रमाणात यश आले आहे. त्यामुळेच या यादीत पाचव्या क्रमांकावरही जपानमधीलच ‘टोकियो’ हे शहर आले आहे.

Advertisement

विशेष म्हणजे या यादीत एकट्या ऑस्ट्रेलियामधीलच चार शहरे आहेत. त्यात तिसऱ्या क्रमांकावर ऍडलेड, सहाव्या स्थानी पर्थ, नवव्या स्थानी मेलबर्न आणि दहाव्या क्रमांकावर ब्रिस्बेन या शहराचा समावेश आहे.

राहण्यायोग्य जगातील ‘टॉप टेन’ शहरे
रँक……. शहर ………..देश
1 ………ऑकलंड …… न्यूझीलंड
2 …….. ओसाका ……. जपान
3 …….. एडलेड………..ऑस्ट्रेलिया
4 ………वेलिंग्टन……. न्यूझीलंड

Advertisement

5 ……… टोकियो …….जपान
6 ……… पर्थ…………. ऑस्ट्रेलिया
7 …….. जुरीच………. स्विझर्लंड
8 ………जिनिव्हा……स्विझर्लंड

9 ………मेलबर्न ……..ऑस्ट्रेलिया
10 ….. ब्रिस्बेन……… ऑस्ट्रेलिया

Advertisement

भारतीयांसाठी खेदजनक गोष्ट म्हणजे या यादीत एकही भारतीय शहराचा समावेश झालेला नाही. भारतात मोठ्या प्रमाणात कोरोनाचा झालेला प्रसार त्यासाठी कारणीभूत ठरला आहे.

Advertisement