SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

शाळा-कॉलेज अजूनही बंदच, मग ऑनलाईन क्लाससाठी कमी बजेटमध्ये खास फीचर्स असणारा लॅपटॉप शोधताय? मग ‘हे’ आहेत बेस्ट पर्याय..

कोरोना महामारीमुळे शाळा, महाविद्यालय देखील ऑनलाईन सुरू आहेत. सरकारकडून अनलॉक प्रक्रिया राबवणं चालू असले, तरी शाळा, महाविद्यालय सध्या बंदच आहेत. मग विद्यार्थ्यांना ऑनलाईन शिक्षणासाठी अशा स्थितीमध्ये लॅपटॉपची आवश्यकता भासते. म्हणून तुम्ही कमी बजेटमध्ये उत्तम लॅपटॉप शोधत असाल तर 30 हजारांपेक्षा कमी किंमतीत येणाऱ्या लॅपटॉप्सबद्दल माहीत करून घ्या..

आकर्षक लॅपटॉप्स आणि त्यांचे दमदार फीचर्स

Advertisement

▪️ Asus Vivobook (Windows 10): या लॅपटॉपचा मॉडेल नंबर M515DA-EJ001T आहे आणि हा लॅपटॉप AMD Athlon Silver 350 U प्रोसेसर, 1 टीबी एचडीडी स्टोरेजसह, 4 जीबी DDR4 रॅम, AMD Radeon इंटिग्रेटेड ग्राफिक्स, 15.6 इंच फूलएचडी डिस्प्ले व विंडोज 10 होम ऑपरेटिंग सिस्टमसोबत येतो. या आकर्षक लॅपटॉपची किंमत फक्त 27,990 रुपये आहे.

▪️ HP Chromebook 14a-na0002TU laptop: HP कंपनीचा Laptop इंटेल Celeron N4020 प्रोसेसर, 64 जीबी एसएसडी स्टोरेज, गूगल क्रोम ओएस, 4 जीबी रॅम, 14 इंच डिस्प्ले आणि इंटिग्रेटेड ग्राफिक्ससह येतो. या लॅपटॉपची किंमत फक्त 25,990 रुपये इतकी आहे.

Advertisement

▪️ Acer Aspire 3 Windows 10 laptop: या Acer Laptop मध्ये ग्राहकांना 4 जीबी रॅम, 1 टीबी स्टोरेज, AMD Ryzen 3 प्रोसेसर, विंडोज 10 होम ऑपरेटिंग सिस्टम, 15.6 इंच स्क्रीन येते. लॅपटॉपची देशात किंमत 29,690 रुपये इतकी आहे.

▪️ HP 15s Windows 10 laptop: एचपी ब्रँडचा लॅपटॉप तुम्हाला कमी किंमतीत घ्यायचा असेल तर हा बेस्ट ऑप्शन आहे. या मॉडेलमध्ये 4 जीबी रॅम, विंडोज 10 होम ऑपरेटिंग सिस्टम, 1 टीबी एचडीडी स्टोरेज, Intel Celeron N4020 प्रोसेसर येईल. या लॅपटॉपची किंमत 26,990 रुपये आहे.

Advertisement

▪️ ASUS VivoBook 14 (2020) Windows 10 laptop: ASUS VivoBook 14 (2020) लॅपटॉपमध्ये 14 इंच फूल एचडी स्क्रीन, विंडोज 10 ऑपरेटिंग सिस्टम, Intel Quad Core Pentium Silver N5030 प्रोसेसर, 4 जीबी रॅम, 1 टीबी एचडीडी स्टोरेज, इंटिग्रेटेड ग्राफिक्स मिळेल. याची किंमत 24,990 रुपये आहे.

▪️ Lenovo Ideapad S145 Windows 10 laptop: अत्यंत कमी बजेटमध्ये येणाऱ्या Lenovo Laptop मॉडेलमध्ये 15.6 इंच फुल एचडी स्क्रीन मिळेल. सोबतच 1 टीबी स्टोरेज, 4 जीबी रॅम, AMD RYZEN 3 3200U प्रोसेसर आणि हा लॅपटॉप मॉडेल विंडोज 10 ऑपरेटिंग सिस्टमवर चालतो. या लॅपटॉपला 28,990 रुपयांत तुम्ही खरेदी करू शकाल.

Advertisement

▪️ HP 14 (2021) : या यादीतील इतर सर्व मॉडेल्स 4 जीबी रॅमसोबत येतात. परंतु एचपी ब्रँडच्या या लॅपटॉप मॉडेलमध्ये तुम्हाला 8 जीबी रॅम, 256 जीबी एसएसडी स्टोरेज, Intel Celeron N4500 प्रोसेसर, विंडोज 10 ऑपरेटिंग सिस्टम आमि 14 इंच एचडी स्क्रिन मिळेल. या लॅपटॉपला 29,990 रुपयात खरेदी करता येईल.

महत्वाचं – सदर माहितीतील सर्व लॅपटॉप्सच्या किंमती या विविध ऑफर्सनुसार कमी-अधिक किंमतीत ई-कॉमर्स वेबसाईटवर उपलब्ध आहेत. म्हणून किंमतीत वारंवार अंशतः बदल होऊ शकतो.

Advertisement