SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

सोन्याची झळाळी उतरली, चांदीच्या भावातही घसरण, जाणून घ्या आजचे बाजारभाव..!

कोरोना संकटामुळे आर्थिक क्षेत्रावर अनिश्चिततेचे सावट पसरले आहे. अशा असुरक्षित वातावरणात सोन्याची झळाळी फिकी पडताना दिसत आहे.

गुंतवणूकदार भांडवली बाजाराकडे वळले आहेत. सुरक्षित समजल्या जाणाऱ्या सोन्यातील गुंतवणूक कमी झाल्याचे दिसत आहे. आज (मंगळवारी) सकाळच्या सत्रात सोने 70 रुपयांनी, तर चांदीच्या भावात 200 रुपयांची घसरण झाली.

Advertisement

मल्टी कमॉडिटी एक्सचेंज (Multi commoditi Exchange)मध्ये सोन्याच्या भावात 70 रुपयांची घसरण होऊन प्रति तोळा 49071 रुपये झाला होता. तसेच, एक किलो चांदीचा भाव 71574 रुपये झाला आहे. त्यात 243 रुपयांची घसरण झाली. गेल्या आठवड्यात (मंगळवारी) चांदीने 73100 रुपयांचा टप्पा गाठला होता.

विविध शहरातील सोन्याचा भाव (प्रति तोळा)

Advertisement
  • मुंबई- 47500 रुपये (22 कॅरेट), 48500 (24 कॅरेट).
  • दिल्ली- 47940 रुपये (22 कॅरेट), 52290 (24 कॅरेट)
  • चेन्नई- 46300 रुपये (22 कॅरेट), 50500 (24 कॅरेट)
  • कोलकता -48020 रुपये (22 कॅरेट), 50720 (24 कॅरेट)

‘स्पॉट गोल्ड’चे दरही सोमवारी (ता.7) 0.5 टक्क्यांनी घसरले होते. अमेरिकी उत्पन्न आणि डॉलरमध्ये वाढ झाल्याने सराफा धातूचे आकर्षण कमी झाले आहे. त्याचा सोन्याच्या भावावर परिणाम होताना दिसत आहे.

अमेरिकी बाजारात गुंतवणूकदारांनी सुरक्षित सोन्याकडे पाठ केल्याने सोन्याच्या भावाने 1900 डॉलरखालील पातळी गाठली. जागतिक अर्थव्यवस्थेतील वेगवान सुधारणा, वाढते तेलाचे दर, अमेरिकी फेडरल रिझर्व्हकडून चलनधोरणातील संभाव्य बदल, यामुळे सोन्याच्या दरांवर पुढील आठवड्यात दबाव येण्याची शक्यता आहे.

Advertisement