SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

मराठा आरक्षणासाठी पंतप्रधानांना साकडे, मोदी-ठाकरे यांच्यात ‘या’ मुद्द्यांवरही खलबतं..!

मराठा आरक्षणासह (Maratha reservation) विविध मागण्यांसाठी आज (ता.8) मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांची नवी दिल्लीतील त्यांच्या निवासस्थानी भेट घेतली.

उभय नेत्यांमध्ये जवळपास दीड तास चर्चा झाली. त्यानंतर मुख्यमंत्री ठाकरे, उपमुख्यमंत्री पवार आणि अशोक चव्हाण यांनी माध्यमांशी संवाद साधला.

Advertisement

कोणत्या विषयांवर चर्चा झाली?

 • मराठा समाजाच्या आरक्षणाचा मुद्दा
 • इतर मागासवर्गीयांचे राजकीय आरक्षण
 • मागासवर्गीय समाजाचे पद्दोन्नतीतील आरक्षण
 • राज्याचा ‘जीएसटी’चा परतावा
 • पीकविम्याचा ‘बीड पॅटर्न’
 • कांजूरमार्ग कारशेड मंजुरी
 • नैसर्गिक आपत्तीतील मदतीचे निकष बदलण्याबाबत
 • 14 व्या वित्त आयोगातील शहरी-ग्रामीण भागासाठीचा निधी मंजूर करावा
 • मराठीला अभिजात भाषेला दर्जा मिळावा
 • राज्यपाल नियुक्त 12 आमदार
 • बल्क ड्रग पार्क : स्पर्धात्मक निविदेस मंजुरी

सगळे विषय गांभीर्याने समजून घेतले
मुख्यमंत्री ठाकरे म्हणाले, की “मराठा आरक्षणाबाबत पंतप्रधान मोदी यांच्याशी सकारात्मक चर्चा झाली. आम्ही त्यांना एक विस्तृत पत्र दिलं असून, मराठा आरक्षणाचा प्रश्न ते नक्की सोडवतील. मोदींनी आमचे सगळे विषय गांभीर्याने समजून घेतले.”

Advertisement

🎯 तमाम महाराष्ट्राला व्हॉट्सॲपवर न्यूज अपडेट्स पुरवणारे ‘स्प्रेडइट – डिजिटल न्यूजपेपर’ नक्की जॉईन करा 👉https://cutt.ly/impnews

Advertisement