SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

बँक म्हणतेय, ‘डेबिट कार्डच्या च्या 3 सेटिंग्ज बदला, ऑनलाईन फ्रॉडपासून सावध राहा!’

डिजीटल जमान्यात आज बऱ्याच गोष्टी डिजिटल झाल्यात, आपण हे जाणतोच! घरात लागणारी प्रत्त्येक गोष्ट ही बहुधा ऑनलाईनच मिळते, नाही का? तसंच अगदी बॅंकांचाही यात समावेश होतोच. काही बँका ऑफलाईन तर काही ऑनलाईन सर्व्हिस देतात. आजच्या काळात सर्वच व्यवहार हे जवळपास ऑनलाईन आहेत.

ऑनलाईन सेवांचा जितका फायदा आहे तेवढाच धोकाही आहे. अशातच ऑनलाईन गंडा घालण्याच्या पद्धत्तीत नवीन पद्धतीही आल्या आणि याप्रकारातही वाढ झाली आहे. म्हणून या गोष्टींना आळा घालण्यासाठी रिझर्व्ह बॅंक ऑफ इंडिया (Reserve Bank of India) ग्राहकांना वारंवार अलर्ट देत असते. आरबीआयने आता डेबिट कार्डधारकांना (Debit Card Holders) आपल्या कार्ड सेटिंगमध्ये बदलण्याचं आवाहन केलं आहे, याबाबत ट्विटरवर ट्विट करत माहीती दिली आहे.

Advertisement

देशात मोठ्या संख्येने बॅंक खातेधारक डेबिट कार्डचा वापर करतात. मात्र त्यांच्या काही निष्काळजीपणामुळे काही डेबिट कार्डधारक फसवणुकीत बळीचा बकरा बनतात.
ऑनलाईन गंडा (Online Fraud) बसला की, मग पैसे गेल्याची तक्रार देतात, पण नेहमीच यावर उपाय निघून पैसे परत मिळण्याची शक्यता जरा कमीच असते.

त्यासाठीच आरबीआयने कार्डधारकांना आवाहन केलं आहे. आरबीआयने डेबिट कार्डाच्या सेटिंगमध्ये बदल करण्यास सांगण्यात आले आहे. तसंच असं केल्याने ऑनलाईन फ्रॉ़ड होण्याची शक्यता कमी होण्यास मदत होणार आहे. ट्विट करत याबाबतची माहिती RBI ने दिली आहे.

Advertisement

फसवणुकीच्या प्रकारापासून वाचण्यासाठी आपण कोणती खबरदारी घ्यावी..?

शक्यतो डेबिट कार्ड वापरून ग्राहकांना दररोज व्यवहार करण्याचाही मर्यादा (पैसे डिपॉसिट/काढणे) त्यानुसार दररोज ठराविक रक्कमेनुसार व्यवहार करता येतो. डेबिट कार्डाद्वारे कमीत कमी व्यवहार (Transaction) करावे.
यामुळे कोणीही ऑनलाईन फसवणूक करु शकणार नाही.

Advertisement

डेबिट कार्डसाठीही काही मर्यादा असतात. म्हणजेच काही डेबिट कार्ड हे केवळ देशांतर्गतच (उदा. रूपे कार्ड) वापरता येते. सेटिंग बदलून या कार्डाचा वापर परदेशातही केला जातो. पण जर तुम्हाला डेबिट कार्डवर आंतरराष्ट्रीय व्यवहार करायचा नसेल, तर तुम्ही आंतरराष्ट्रीय सेवा तात्पुरती खंडित करु शकता. यासाठी बँकेचे कोणते ॲप्लिकेशन सेवा देते याची चौकशी करा. यामुळे तुमच्या सोबत होणाऱ्या फसवणुकीची शक्यता आणखी कमी होते.

डेबिट कार्डवर दैनंदिन मर्यादा निश्चित केल्याने ठराविक रक्कमेनंतर डेबिट कार्डने व्यवहार करता येणार नाही. तसेच आपल्याला काही बँकांचे डेबिट कार्ड काही काळासाठी वापर नसला की स्विच ऑफ किंवा वापर करतेवेळी स्विच ऑन करता येते. सेटिंग बदलण्यासाठी ग्राहकांना आपल्या बॅंकेच्या वेबसाईटवरुन नेट बॅंकिगद्वारे (Net Banking) हे बदल करता येतील.

Advertisement

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
🎯 तमाम महाराष्ट्राला व्हॉट्सॲपवर न्यूज अपडेट्स पुरवणारे ‘स्प्रेडइट – डिजिटल न्यूजपेपर’ नक्की जॉईन करा 👉https://cutt.ly/impnews

Advertisement