SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

21 जूनपासून 18 वर्षांवरील सर्वांना केंद्र सरकार मोफत लस देणार, पंतप्रधान मोदी यांची घोषणा..!

कोरोना लसीकरणाची राज्यांना दिलेली 25 टक्के जबाबादारी आता केंद्र सरकार परत स्वीकारत आहे. जागतिक योग दिनानिमित्त 21 जूनपासून देशातील 18 वर्षांवरील सर्वांना केंद्र सरकार मोफत लस देणार असल्याची घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केली.

देशाला संबोधित करताना, मोदी म्हणाले, की “केंद्र सरकार लस खरेदी करुन ती राज्यांना मोफत पुरवली जाईल. तसेच, खासगी रुग्णालयात पैसे देऊन लस घेता येईल. मात्र, खासगी रुग्णालये 150 रुपये अतिरिक्त चार्ज लावूनच लस देऊ शकतात. या किमतीवर राज्य सरकारांनी नियंत्रण ठेवावं.”

Advertisement

“मागील वर्षी कोरोनामुळे लॉकडाऊन केल्याने पंतप्रधान गरीब कल्याण अन्नयोजनेतून 8 महिने मोफत स्वस्त धान्य पुरवलं. यावर्षीही दुसऱ्या लाटेमुळे मे-जूनपर्यंत ही योजना राबवली. मात्र, आता दिवाळीपर्यंत 80 कोटी नागरिकांना मोफत स्वस्त धान्य पुरवले जाईल,” असे मोदी यांनी जाहीर केले.

लसीकरणाबाबत काही राज्यांच्या भूमिकेवर नाराजी व्यक्त करताना मोदी म्हणाले, की “काही राज्यांनी लसीकरणाबाबत प्रश्न विचारले. वयोगट का, विकेंद्रीकरण का नाही, ज्येष्ठांनाच का पहिली लस, देशातील काही मीडियाने तर याबाबत ‘कॅम्पेन’ केलं. अखेर राज्यांच्या आग्रहास्ताव 16 जानेवारीपासून नियम बदलून 25 टक्के काम राज्यांवर सोपविले होते. त्यानंतर राज्यांना समजलं, की केंद्राचीच यंत्रणा नीट काम करीत होती.”

Advertisement

‘नेझल व्हॅक्सिन’ची चाचपणी
मोदी म्हणाले, “देशात सध्या 7 कंपन्या लसनिर्मिती करीत आहेत. आणखी 3 लसींची ट्रायल सुरु आहे. अन्य कंपन्यांशीही संपर्क करीत आहोत. देशात ‘नेझल व्हॅक्सिन’ची (नाकात स्प्रे मारुन) चाचपणी सुरु आहे. ही लस यशस्वी झाली, तर भारताच्या लसीकरण मोहिमेला आणखी गती येईल.”

भारतात 23 कोटी जनतेचं लसीकरण
भारताने वर्षभरात एकच नाही, तर दोन ‘मेड इन इंडिया’ लसींची निर्मिती केली. आपल्या शास्त्रज्ञांनी दाखवलं, भारत हा जगात मोठ्या देशांच्या मागे नाही. आतापर्यंत देशातील 23 कोटी नागरिकांचे लसीकरण पूर्ण झाले असल्याचे मोदी यांनी सांगितले.

Advertisement

🎯 तमाम महाराष्ट्राला व्हॉट्सॲपवर न्यूज अपडेट्स पुरवणारे ‘स्प्रेडइट – डिजिटल न्यूजपेपर’ नक्की जॉईन करा 👉https://cutt.ly/impnews

Advertisement