SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

एका आंब्याची किंमत हजार रुपये..! पाहा कुठे पिकतो हा फळांचा राजा, नव्हे राणी..?

आंब्याला ‘फळांचा राजा’ म्हणून ओळखले जात असले, तरी या राजाची एक राणीही आहे. या राणीचे नाव आहे, ‘नुरजहाँ’..! पण, ही राणी (आंबा) सर्वसामान्य माणसाच्या खिशाला परवडू शकत नाही. कारण, एका आंब्याची किंमत पाहूनच तुमचे डोळे पांढरे होतील. अर्थात, कितीही महाग असला, तरी आंब्याचे दर्दी चाहते असतातच की..!

मध्य प्रदेशातील (Madhya Pradesh) अलिराजपूर जिल्ह्यातील काठीवाडा भागात ‘आंब्यांची राणी’ म्हणून प्रसिद्ध असलेला ‘नूरजहाँ’ आंब्याचे उत्पादन होते. भरभक्कम आकारमान आणि चवीसाठी हा आंबा प्रसिद्ध आहे. मध्य प्रदेशसह गुजरातमध्येही हा आंबा लोकप्रिय आहे. गेल्या वर्षाच्या तुलनेत अनुकूल हवामानामुळे यंदा या आंब्याचे मोठ्या प्रमाणात उत्पादन झालं आहे.

Advertisement

‘नूरजहाँ’ आंबा मूळचा अफगाणिस्तानचा. मात्र, तो भारतात आला नि इथला झाला. असे असले, तरी तो भारतभर पसरलेला नाही. गुजरातच्या सीमेला लागून असलेल्या अलिराजपूर जिल्ह्यातील काठीवाडा भागातच या आंब्याची लागवड होते.

‘नूरजहाँ’ आंब्याला साधारण जानेवारी-फेब्रुवारीतच मोहोर येण्यास सुरुवात होते. जूनमध्ये हा आंबा पिकतो. सुमारे एक फूट लांब हा आंबा वाढू शकतो. त्याचं वजन 2 ते 3.5 किलोपर्यंत भरते, तर एका कोयीचे (बाठी) वजनच 150 ते 200 ग्रॅम असतं. विशेष म्हणजे, फळ झाडावर असतानाच, चाहते त्याचं बुकिंग करतात.

Advertisement

काठीवाडातील एका आंबा उत्पादकाने सांगितले, की त्यांच्या बागेतील तीन झाडांनी 250 आंबे आले होते. एका फळाची किंमत 500 ते 1000 रुपयांपर्यंत आली.

गेल्या वर्षी कोविडमुळे आंब्याच्या व्यापारावर परिणाम झाला. प्रतिकूल हवामानामुळे ‘नूरजहाॅं’ आंबा बहरला नाही, तरी 2019 मध्ये एका आंब्याचे वजन सरासरी 2.75 किलो भरले. लोकांनी त्याला 1200 रुपये भाव दिल्याचे एका व्यापाऱ्याने सांगितले.

Advertisement

🎯 तमाम महाराष्ट्राला व्हॉट्सॲपवर न्यूज अपडेट्स पुरवणारे ‘स्प्रेडइट – डिजिटल न्यूजपेपर’ नक्की जॉईन करा 👉https://cutt.ly/impnews

Advertisement