SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

🔯 आजचे राशिभविष्य (Horoscope): तुमचा आजचा दिवस कसा असेल जाणून घ्या..

🗓️ रविवार, 6 जून 2021

मेष (Aries) : धैर्य, संयमाने परिस्थिती हाताळावी. गरजूंना प्राधान्याने मदत करावी. वाट पाहात असलेले निर्णयाचे उत्तर मिळेल.

Advertisement

वृषभ (Taurus) : आरोग्याच्या तक्रारींकडे दुर्लक्ष करू नये. वेळीच वैद्यकीय सल्ला घेणे हिताचे ठरेल. पथ्यपाणी, औषधे चुकवू नयेत.

मिथुन (Gemini) : भागीदारीतील व्यापारातून फायदा मिळेल. महत्त्वाचा निर्णय घ्यावा लागेल. जोडीदाराशी मैत्रीपूर्वक व्यवहार करा.

Advertisement

कर्क (Cancer) : सावधगिरी बाळगून व्यवहार करावेत. उत्तम संधी उपलब्ध होतील. संधीचे सोने करणे आपल्या हातात राहील. आहारातील पथ्ये ना चुकता पाळा.

सिंह (Leo) : सुख, शांतता अनुभवाल. नोकरदार वर्गाला उत्तम दिवस. सामाजिक क्षेत्रात उत्तम अधिकार प्राप्त होतील. भागीदारीत योग्य मोबदला पदरात पडेल.

Advertisement

कन्या (Virgo) : नवीन प्रकल्पाचा शुभारंभ होऊ शकेल. जुने वाद मिटू शकतील. आपला दिवस आनंदात घालवाल.

तूळ (Libra) : वादाचे प्रसंग कटाक्षाने टाळा. आत्मविश्वासाने कार्यरत राहावे. अनोळखी आजारांना वेळीच बाजूला सारा. छोटे प्रवास घडतील.

Advertisement

वृश्चिक (Scorpio) : चांगल्या कामासाठी पैसे खर्च होतील. विशेष मान, सन्मान मिळतील. शक्य नसल्यास खोटी आश्वासने इतरांना देऊ नका.

धनु (Sagittarius) : नवीन योजनांवर भर द्याल. कौटुंबिक वातावरण आनंदी असेल. स्वतःवर पूर्ण विश्वास ठेवा. गोंधळलेल्या अवस्थेत शांत होऊन विचार करा.

Advertisement

मकर (Capricorn) : रचनात्मक कार्यात दिवस जाईल. आवडीचे काम करायला मिळेल. जुन्या अडकलेल्या पैशाचे व्यवहार मार्गी लावा.

कुंभ (Aquarius) : प्रलंबित कामे मार्गी लागतील. महत्त्वाच्या विषयावर चर्चा होईल. जवळच्या व्यक्तीकडून आपण फसत नाही ना याचा अंदाज घेऊन पुढे जा.

Advertisement

मीन (Pisces) : दिनक्रम व्यस्त राहू शकेल. आध्यात्मिक आवड वाढील लागेल. नोकरीत-व्यवसायात आपल्या कामाच्या संदर्भात प्रशंसा होईल.

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
🎯 तमाम महाराष्ट्राला व्हॉट्सॲपवर न्यूज अपडेट्स पुरवणारे ‘स्प्रेडइट – डिजिटल न्यूजपेपर’ नक्की जॉईन करा 👉https://cutt.ly/impnews

Advertisement