SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

व्हॉट्सअ‍ॅपचे ‘व्हॉईस मॅसेजसाठी’ खास फिचर, हे नेमकं कसं उपयोगी पडेल, जाणून घ्या..

व्हॉट्सअ‍ॅप (WhatsApp) आपल्या यूझर्ससाठी सतत या ना त्या फिचर्सवरती काम करत असते. असंच एक भारी वाटेल असं फिचर व्हॉट्सअ‍ॅप आणत आहे आणि युजर्सना खूश करण्याचा प्रयत्न करत आहे.

वाचा नवीन फीचरबद्दल…

Advertisement

सोशल मीडियामध्ये व्हॉट्सअ‍ॅप (WhatsApp) हे जगात सर्वांत जास्त वापरले जाणारे मॅसेजिंग अ‍ॅप आहे. व्हॉट्सअ‍ॅपच्या नवीन फीचरबद्दल सांगायचं झालं तर हे Voice Message Feature आहे.

यात व्हॉट्सअ‍ॅप यूजर व्हॉईस (Voice) मॅसेजचा प्ले बॅक स्पिड वाढवू शकतात. फास्ट प्लेबॅक फीचर अंतर्गत व्हॉईसचा पिच न बदलता डिफॉल्ट 1 सेटिंग ठेवल्यास प्लेबॅक मॅसेजची स्पिड 1.5 किंवा 2 पटीने वाढतो.

Advertisement

व्हॉट्सअ‍ॅपने प्रसिद्ध केलेल्या माहितीनुसार, हे फीचर वापरणे अगदी सोपे आहे. कारण जेव्हा तुम्ही Voice (WhatsApp Voice Message) मॅसेजला प्रेस करुन त्याला प्ले करता, त्याठिकाणी आपल्याला प्लेबॅक, स्पिड दिसेल, जी डीफॉल्टनुसार 1 पट सेट केली जाईल. आपण प्लेबॅकच्या स्पिडला (Playback Speed) टच करुन, त्या व्हॉईस मॅसेजचा स्पिड दीड पट किंवा दोन पट वाढवू शकतो.

व्हॉट्सअ‍ॅपने आपल्या निवेदनात म्हटलं की, फास्ट प्लेबॅकला लॉंच करताना व्हॉट्सअ‍ॅपने फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्वीटरवर (Facebook, Instagram, Twitter) एक व्हीडिओ शेअर केलाय. व्हॉट्सअ‍ॅपच्या या विशेष वैशिष्ट्यामुळे, आता व्हॉट्सअ‍ॅप वापरकर्त्यांना भला-मोठा Voice मॅसेज ऐकण्यासाठी खूप वेळ लागणार नाही.

Advertisement

व्हॉट्सअ‍ॅप बिझनेस युजर्ससाठीही खास फीचर्स येणार

व्हॉट्सअ‍ॅपने व्हॉट्सअ‍ॅप बिझनेस (Whatsapp Buisness) वापरणाऱ्यांसाठीही खास फिचर आणत आहे, ज्याने बिझनेस यूझर्स सहजपणे स्टिकर शोधू शकतील. सध्या स्टिकर्स सर्च ऑफ व्हॉट्सअ‍ॅप बीटा व्हर्जन चाचणीच्या टप्प्यात आहे. सोबतच व्हॉट्सअ‍ॅप छोट्या आणि मध्यम बिझनेस यूझर्सला व्यवसाय सुरू करण्यासाठी आणि वाढवण्यासाठी थेट फेसबुक वरून मदत दिली जाईल. व्हॉट्सअ‍ॅप बिझनेस नाना प्रकारच्या मॅसेजेसना सपोर्ट करेल. याशिवाय कोणती वस्तू कधी स्टॉकमध्ये आली, लोकांना सहज कळण्यास मदत होईल.

Advertisement

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
🎯 तमाम महाराष्ट्राला व्हॉट्सॲपवर न्यूज अपडेट्स पुरवणारे ‘स्प्रेडइट – डिजिटल न्यूजपेपर’ नक्की जॉईन करा 👉https://cutt.ly/impnews

Advertisement