SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

राज्यात सोमवारपासून ‘अनलॉक’ प्रक्रिया सुरु, तुमचा जिल्हा कधी ‘अनलॉक’ होणार पाहा..?

महाराष्ट्र ‘अनलॉक’ करण्यावरून सुरु असलेला गोंधळ एकदाचा मिटला. शुक्रवारी (ता.4) मध्यरात्री सरकारने ‘अनलॉक’बाबतची नियमावली जारी केली. राज्यात ‘अनलॉक’साठी पाच टप्पे ठरविण्यात आले आहेत. कोरोनाचा पॉझिटिव्हिटी रेट आणि ऑक्सिजन बेड्स या आधारावर हे टप्पे ठरविले आहेत.

असे असतील ‘अनलॉक’चे पाच टप्पे

Advertisement

पहिला टप्पा : कोरोनाचा पॉझिटिव्हिटी रेट 5 टक्क्यांपेक्षा कमी आणि ऑक्सिजन बेड 25% पेक्षा कमी भरलेले असल्यास सर्व व्यवहार खुले केले जाणार. जिल्हे – औरंगाबाद, भंडारा, बुलढाणा ,चंद्रपूर, धुळे, गडचिरोली, गोंदिया, जळगाव, जालना, लातूर, नागपूर, नांदेड, नाशिक, परभणी, ठाणे, वर्धा, वाशिम, यवतमाळ.

दुसरा टप्पा : पॉझिटिव्हिटी रेट 5% आणि ऑक्सिजन बेड 25% ते 40% भरलेले आहेत, असे जिल्हे. 50 टक्के व्यवहार सुरु होतील. जिल्हे – अहमदनगर, अमरावती, हिंगोली, मुंबई, मुंबई उपनगर, नंदुरबार.

Advertisement

तिसरा टप्पा : पॉझिटिव्हिटी रेट 5 ते 10% आणि ऑक्सिजन बेड 40% हून अधिक भरलेले असतील. या जिल्ह्यात सायंकाळी 5 वाजता सर्व व्यवहार बंद होतील. सिनेमागृहे, सभागृहे, नाट्यगृहे बंद राहतील. जिल्हे : अकोला, बीड, पालघर, रत्नागिरी, सांगली, सातारा, सिंधुदुर्ग, सोलापूर, उस्मानाबाद, कोल्हापूर.

चौथा टप्पा : पॉझिटिव्हिटी रेट 10% ते 20% आणि ऑक्सिजन बेड 60% असलेले जिल्हे. सायंकाळी ५ नंतर सर्व व्यवहार बंद, तसेच शनिवार, रविवारी पूर्ण व्यवहार बंद असतील. जिल्हे : पुणे, रायगड.

Advertisement

पाचवा टप्पा : पॉझिटिव्हिटी रेट 20 टक्क्याहून अधिक आणि 75% टक्क्याहून अधिक ऑक्सिजन बेड भरलेले जिल्ह्याचा समावेश असेल.

🎯 तमाम महाराष्ट्राला व्हॉट्सॲपवर न्यूज अपडेट्स पुरवणारे ‘स्प्रेडइट – डिजिटल न्यूजपेपर’ नक्की जॉईन करा 👉https://cutt.ly/impnews

Advertisement