SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

‘बीएमडब्ल्यू’ची ‘बाईक’ येतेय.. किंमत पाहून तोंडात बोटे घालाल..!

‘बीएमडब्ल्यू’ म्हणजे ‘हाय क्लास’. या ब्रॅण्डची कार आपण भारतातील रस्त्यावर धावताना पाहिली असेल. मात्र, आता लवकरच ‘बीएमडब्ल्यू’ची ‘बाईक’ही तुम्हाला आपल्या रस्त्यावर धावताना दिसू शकेल.

‘बीएमडब्ल्यू’ मोटरराड (BMW Motorrad) कंपनी लवकरच ‘बीएस 6’ अनुरूप ‘S1000R’ ही बाईक भारतात लाॅंच करणार आहे. ‘डुकाटी स्ट्रीट फायटर व्ही- 4’ आणि ‘कावासाकी झेड एच-2’ यांसारख्या ‘बाईक’शी ‘बीएमडब्लू’ बाईकची स्पर्धा असेल.

Advertisement

आंतरराष्ट्रीय बाजारात ही बाईक कधीच आली आहे. परदेशात विकल्या जाणाऱ्या बाईकप्रमाणेच भारतीय मॉडेलही असणार आहे.

‘बीएमडब्ल्यू’ बाईकची वैशिष्ट्ये

Advertisement
  • बाईकच्या पुढील बाजूस नवीन एलईडी हेडलाइट सेटअपचा वापर केला आहे.
  • नवे हेडलँप ‘2021 BMW G310R’ आणि ‘F900R’ बाईक्सप्रमाणे डिझाईन आहे.
  • इतर डिझाईन ‘अपडेट्स’मध्ये रीमास्टर्ड रेडिएटर स्राउड, फ्यूल टँक आणि बेली पॅनचा समावेश आहे.
  • इंजिन क्षमता- 999 cc
  • गिअर – 6 स्पीड
  • मायलेज – 16.12 किलोमीटर पर लिटर
  • कमाल स्पीड – 299 ते 303 km/h

बाईकच्या इलेक्ट्रॉनिक्स किटमध्ये तीन राइडिंग मोड्स (रेन, रोड आणि डायनॅमिक), ABS प्रो, ट्रॅक्शन कंट्रोल सिस्टम आणि हिल स्टार्ट कंट्रोलचा समावेश आहे.

राइडिंग मोड्स प्रो., इंजिन ब्रेक कंट्रोल, पॉवर व्हीली कंट्रोल आणि डायनॅमिक ब्रेक कंट्रोल सारख्या इतर ऑप्शनल फीचर्सचा समावेश आहे.

Advertisement

किंमत – 17 ते 18 लाख रुपये (एक्स शोरुम)

🎯 तमाम महाराष्ट्राला व्हॉट्सॲपवर न्यूज अपडेट्स पुरवणारे ‘स्प्रेडइट – डिजिटल न्यूजपेपर’ नक्की जॉईन करा 👉https://cutt.ly/impnews

Advertisement