SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

व्याजदरात बदल नाही, रिझर्व्ह बँकेचे पतधोरण जाहीर, विकासदर ‘असा’ राहणार..!

रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने (RBI) 2021 या वर्षासाठीचे तिसऱ्या तिमाहीचे आर्थिक धोरण जाहीर करताना व्याजदरात कोणताही बदल केलेला नाही.

रेपो रेट 4 टक्के, तर रिव्हर्स रेपो दर 3.35 टक्के कायम राहणार असल्याचे ‘आरबीआय’चे गव्हर्नर शक्तीकांत दास यांनी सांगितले. त्यामुळे ‘ईएमआय’वर (EMI)कोणताही परिणाम होणार नसल्याचे स्पष्ट झाले आहे.

Advertisement

रिझर्व्ह बँकेच्या आर्थिक धोरण समितीने एप्रिलमध्ये वर्तवलेल्या अंदाजानुसार चालू आर्थिक वर्षात भारताची अर्थव्यवस्था 10.5 टक्के दराने वाढणार असल्याचा अंदाज वर्तवला होता. मात्र, आता भारताची अर्थव्यवस्था चालू आर्थिक वर्षात 9.5 टक्के दराने वाढणार असल्याचे समितीने म्हटलं आहे.

चालू आर्थिक वर्षात किरकोळ महागाईचा दर 5.1 टक्के असेल. अलीकडे कमी झालेल्या महागाईच्या दरामुळे अर्थव्यवस्था वाढीला प्रोत्साहन मिळू शकेल. पहिल्या तिमाहीत 18.5 टक्के, दुसऱ्या तिमाहीत 7.9 टक्के, तिसऱ्या तिमाहीत 7.2 टक्के, तर चौथ्या तिमाहीत 6.6 टक्के दराने अर्थव्यवस्था वाढेल, असे शक्तिकांत दास म्हणाले.

Advertisement

कोरोना लसीकरणामुळे अर्थव्यवस्था स्थिरावण्यास मदत होईल. जसजसे जागतिक ट्रेंडमध्ये सुधारणा होईल, तशी निर्यातही वाढेल. सध्या मागणी नसल्याने किंमतीचा दबाव निर्माण झाला आहे. महागडे क्रूड आणि लॉजिस्टिक खर्चात वाढ झाल्याने किंमतीचा दबाव निर्माण झाल्याचे शक्तिकांत दास यांनी सांगितले.

भारताने औषध उत्पादनात जगाचं नेतृत्व करण्याच्या दृष्टीने धोरण निश्चित केल्यास, कोविडमुळे निर्माण झालेल्या परिस्थितीतून बाहेर पडता येईल, असंही दास यांनी नमूद केलं.

Advertisement

🎯 तमाम महाराष्ट्राला व्हॉट्सॲपवर न्यूज अपडेट्स पुरवणारे ‘स्प्रेडइट – डिजिटल न्यूजपेपर’ नक्की जॉईन करा 👉https://cutt.ly/impnews

Advertisement