SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

जुही चावला हिला 20 लाखांचा दंड, 5G तंत्रज्ञानाविरुद्ध दाखल केलेली याचिका भोवली

भारतात लवकरच सुरु होत असलेल्या 5-G तंत्रज्ञानाविरुद्ध दिल्ली उच्च न्यायालयात दाखल केलेली याचिका अभिनेत्री जुही चावला हिच्या चांगलीच अंगलट आली. न्यायालयाने जुही चावला हिला चांगलच फटकारत 20 लाखांचा दंड ठोठावला आहे.

5-G तंत्रज्ञानांमुळे मानवांच्या आरोग्यावर, तसेच पर्यावरणाचे कायमचे नुकसान होण्याचा धोका आहे. हे तंत्रज्ञान मानव जातीसाठी सुरक्षित आहे का, याबाबत स्पष्टीकरण देण्याचे निर्देश अधिकाऱ्यांना द्यावेत, अशी विनंती जुही चावला हिने याचिकेत केली होती. अ‍ॅडव्होकेट दीपक खोसला यांच्यामार्फत जुही चावला हिने ही याचिका दाखल करण्यात आली होती.

Advertisement

दिल्ली उच्च न्यायालयाने जुहीची याचिका फेटाळून लावली. ही याचिका म्हणजे एक ‘पब्लिसिटी स्टंट’ आहे. त्यामुळेच जुहीने याचिकेवरील सुनावणीची ‘लिंक’ सोशल मीडियावर शेअर केल्याचे न्यायालयाने म्हटलं आहे. तसेच जुहीला 20 लाख रुपयांचा दंडही ठोठावला.

तंत्रज्ञानासंबंधित जुहीला असणाऱ्या चिंतेबाबत सरकारला कोणतेही निवेदन दिले नाही. 5 G नेटवर्क स्थापित करण्याविरोधात थेट न्यायालयात दावा दाखल करण्यावरही हायकोर्टाने प्रश्न केला.

Advertisement

दरम्यान, मागील सुनावणीच्या वेळी मोठ्या आवाजात जुही चावला हिची गाणी लावणाऱ्यांवर कडक कारवाई करण्याचे निर्देश न्यायालयाने दिले आहेत.

🎯 तमाम महाराष्ट्राला व्हॉट्सॲपवर न्यूज अपडेट्स पुरवणारे ‘स्प्रेडइट – डिजिटल न्यूजपेपर’ नक्की जॉईन करा 👉https://cutt.ly/impnews

Advertisement