SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

उत्सुकता संपली! ‘द फॅमिली मॅन 2’ वेबसीरिज झाली रिलीझ, कशी आणि कुठे पाहणार वाचा..

अ‍ॅमेझॉन प्राईम व्हिडीओची ओरिजिनल वेब सीरीज ‘द फॅमिली मॅन’ने प्रेक्षकांच्या मनात अशी काही छाप सोडली की, चाहते गेल्या बऱ्याच दुसऱ्या सीझनची आतुरतेने वाट पाहत होते. या वेब सीरीजचा ट्रेलर रिलीज झाल्यानंतर सोशल मीडियावर (Social Media) वेगानं व्हायरल झाला होता.

या थ्रिलर सिरीजच्‍या 9 भागांच्‍या नवीन सीझनमध्‍ये मध्‍यमवर्गीय मनोज बाजपेयीने ‘फॅमिली मॅन आणि गुप्‍तचर’ अशी दुहेरी भूमिका साकारली आहे यात तो श्रीकांत तिवारी म्हणून भूमिकेत आहे आणि तो नवीन, शक्तिशाली व क्रूर प्रतिस्‍पर्धी राजीचा सामना करणार आहे. विशेष म्हणजे समंथा अक्किनेनीने राजीची भूमिका साकारली आहे.

Advertisement

‘द फॅमिली मॅन 2’ कुठं पाहायचा?

‘द फॅमिली मॅन 2’ अ‍ॅमेझॉन प्राईम व्हिडीओवर रिलीज झाली आहे. आजपासून अ‍ॅमेझॉन प्राईम व्हिडीओवर ही वेब सीरीज (Web Series) पाहता येणार आहे. ही अ‍ॅमेझॉन प्राईम व्हिडीओची ओरिजिनल वेब सीरीज आहे.

Advertisement

ही वेबसिरीज ऑनलाईन (Online) पाहण्याकरिता प्रथम आपल्याला अ‍ॅमेझॉन प्राईम व्हिडीओ ॲप डाऊनलोड करावे लागेल व प्राईम व्हिडीओ सदस्यता ( Amazon Prime Video Subscription) घेतले नसेल तर ते घ्यावे लागणार आहे.

सबस्क्रिप्शन घेण्यासाठी आपल्याला 999 रुपये द्यावे लागेल. त्याची वैधता 1 वर्षांची आहे. म्हणजेच आपण या ओटीटी प्लॅटफॉर्मवर (OTT Platform) रिलीज झाल्यानंतर ताबडतोब सबस्क्रिप्शन घेतल्यापासून एक वर्षापर्यंत विविध चित्रपट (Movies), वेबसिरीज, शोज आणि इतर खूप काही पाहण्याचा आनंद लुटू शकता.

Advertisement

‘द फॅमिली मॅन 2’ पाहण्यासाठी पुढील लिंकवर क्लिक करा 👉 https://twitter.com/i/status/1400520992020058116

‘The Family Man 2’ ची स्टारकास्ट मंडळी

Advertisement

▪️ ‘द फॅमिली मॅन 2’ मध्ये मनोज बाजपेयी सिनिअर एजंट आणि विश्लेषक ‘श्रीकांत तिवारी’ यांच्या भूमिकेत दिसणार आहेत.
▪️ अभिनेत्री समंथा अक्किनेनी दहशतवादी ‘राजलक्ष्मी’च्या भूमिकेत दिसणार आहे.
▪️ अभिनेत्री प्रियामणि श्रीकांत तिवारीची पत्नी ‘सुचित्रा अय्यर तिवारी’ची भूमिका केली आहे.
▪️ शरिब हाश्मी ‘जेके तळपदे’ची भूमिका साकारली आहे.
▪️ दिवंगत अभिनेता असिफ बसरा समुपदेशकाच्या भूमिकेत असणार आहे.
▪️ सीमा बिस्वास ‘पीएम बासू’च्या भूमिकेत आहेत.

‘The Family Man 2’ ची कथा काय आहे?

Advertisement

‘श्रीकांत तिवारी’ च्या (अभिनेता मनोज बाजपेयी) भोवती सगळी कथा फिरते. तो एनआयएचा जॉब (Job) सोडून एक साधीसुधी नोकरी करत आपलं आयुष्य घालवत असतो. पण पण मन मात्र अजूनही एनआयएमध्येच (NIA) गुंतलेले असते. घरात पत्नीबरोबरचे संबंधही नीट नसतात. मग ‘फॅमिली मॅन’ प्रमाणेच तो हे संबंध सुधारण्याचा प्रयत्न करतो. परंतु यामध्ये, देशाच्या दक्षिण भागात अतिशय शक्तिशाली आणि धोकादायक राजी म्हणजेच ‘राजलक्ष्मी’ ही दहशतवादी कारवाया करत असते. या कारवाया थांबवण्यासाठी श्रीकांत तिवारी एनआयएमध्ये परत येतो आणि मग सुरू होते मिशन….

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
🎯 तमाम महाराष्ट्राला व्हॉट्सॲपवर न्यूज अपडेट्स पुरवणारे ‘स्प्रेडइट – डिजिटल न्यूजपेपर’ नक्की जॉईन करा 👉https://cutt.ly/impnews

Advertisement