Take a fresh look at your lifestyle.

 भारतात बनतेय कोरोनावरील सर्वात स्वस्त लस, किंमत पाहून तोंडात बोटे घालाल..!

0

देशात सध्या ‘सीरम’ची ‘कोविशील्ड’, भारत बायोटेकची ‘को-वॅक्सीन’ आणि रशियाची ‘स्पुटनिक- V’ यांचाच वापर केला जात आहे. त्यानंतर आता भारतात आणखी एक ‘स्वस्तात मस्त’ लस तयार होत आहे.

‘बायोलॉजिकल-ई’ कंपनी ही लस तयार करीत आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयानं या कंपनीला 30 कोटी डोसची ‘ऑर्डर’ दिली असून, त्यासाठी 1500 कोटी रुपये ‘अॅडव्हान्स’ देण्याचा निर्णय घेतला आहे. ऑगस्ट ते डिसेंबर 2021 दरम्यान हे डोस मिळू शकतात.

Advertisement

‘बायोलॉजिकल-ई’ या लसीचेही दोन डोस असतील. पहिल्या डोसनंतर 28 दिवसानंतर दुसरा डोस देण्यात येईल. या लसीच्या दोन चाचण्यांचे अहवाल सकारात्मक आले आहेत. कंपनीला तिसऱ्या क्लिनिकल चाचणीसाठी परवानगी देण्यात आली आहे. देशभरातील 1,268 जणांवर या लसीची तिसरी चाचणी केली जाणार आहे.

किंमत अवघी 110 रुपये
केंद्र सरकार 30 कोटी डोससाठी ‘बायोलॉजिकल-ई’ कंपनीला 1500 कोटी रुपये देणार आहे. म्हणेजच एका डोससाठी कंपनीला 50 रुपये खर्च येईल. खासगी बाजारात लसीची किंमत ठरली नसली, तरी जगातील ही सर्वात स्वस्त लस असल्याचं म्हटलं जातंय. या लसीची किंमत प्रति डोस 1.5 डॉलर, म्हणजेच भारतीय चलनानुसार 110 रुपये असू शकते, असे सांगण्यात आलं.

Advertisement

🎯 तमाम महाराष्ट्राला व्हॉट्सॲपवर न्यूज अपडेट्स पुरवणारे ‘स्प्रेडइट – डिजिटल न्यूजपेपर’ नक्की जॉईन करा 👉https://cutt.ly/impnews

Advertisement

Leave a Reply