SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

अखेर बारावीची परीक्षाही रद्द, राज्य सरकारचा मोठा निर्णय..!

दहावीनंतर बारावीचीही परीक्षा रद्द करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. राज्य शिक्षण विभागाने पाठवलेला प्रस्ताव आपत्ती व्यवस्थापन विभागाने स्वीकारला आहे. त्यामुळे आता महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक (Maharashtra Board) शिक्षण मंडळातर्फे घेण्यात येणाऱ्या बारावीच्या परीक्षाही रद्द झाल्या आहेत.

शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी बारावीच्या परीक्षा रद्द करण्याबाबतचा प्रस्ताव आपत्ती व्यवस्थापन विभागाकडे पाठवल्याचं बुधवारी (ता.2) सांगितलं होतं.  मंत्रिमंडळाच्या बैठकीतही बारावीची परीक्षा रद्द करण्याबाबत चर्चा झाली होती.

Advertisement

“बारावीच्या परीक्षेसदर्भातील परिस्थिती आम्ही मंत्रिमंडळासमोर मांडली. आपत्ती व्यवस्थापन विभागाकडे आमचा प्रस्ताव कळवला आहे. आपत्ती व्यवस्थापन विभागाची बैठक दोन दिवसांतच होईल. त्यांची परवानगी आली की आम्ही परीक्षेचा निर्णय जाहीर करू,” असे शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी सांगितले होते.

केंद्र सरकारने दोन दिवसापूर्वीच ‘सीबीएससी’ बोर्डाच्या बारावीच्या परीक्षा रद्द केल्या होत्या. राज्य सरकारनेही याबाबत विचारणा केली होती. आम्ही मंत्रीमंडळाला इतर राज्यांची माहिती दिली. त्यानुसार आम्ही बारावी परीक्षेच्या निर्णयाची फाईल आपत्ती विभागाकडे सोपवत आहोत.

Advertisement

कोरोनामुळे ही एक असाधारण परिस्थिती असल्याने आपत्ती विभागाच्या निर्णयानंतर आम्ही बारावी परीक्षेचा निर्णय घेऊ. मात्र, मुलांचं आरोग्य ही आमची प्राथमिकता आहे. केंद्र सरकारसोबत झालेल्या बैठकीत आम्ही जी भूमिका मांडली, तीच भूमिका आपत्ती व्यवस्थापन विभागाला कळविल्याचे गायकवाड यांनी सांगितले.

14 लाख विद्यार्थ्यांना दिलासा

Advertisement

राज्य सरकारच्या या निर्णयामुळे बारावीच्या 14 लाख विद्यार्थ्यांना दिलासा मिळाला आहे.  सीबीएसई, आयसीएसई, हरयाणा आणि गुजरात सरकारनेदेखील बारावीच्या परीक्षा रद्द केल्या आहेत.

🎯 तमाम महाराष्ट्राला व्हॉट्सॲपवर न्यूज अपडेट्स पुरवणारे ‘स्प्रेडइट – डिजिटल न्यूजपेपर’ नक्की जॉईन करा 👉https://cutt.ly/impnews

Advertisement