सीबीएसईच्या बारावीच्या परीक्षा रद्द करण्यात आल्यानंतर आता काउंसिल फॉर द इंडियन स्कुल सर्टिफिकेट एग्जामिनेशन्स (CISCE)ने देखील बारावी बोर्डाची परीक्षा रद्द केल्याची घोषणा नुकतीच केली आहे.
CBSE बोर्डाच्या बारावीच्या परीक्षा रद्द होणार:
सीबीएसई बोर्डाच्या परीक्षांबाबतच्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल घेतलेल्या महत्त्वपूर्ण बैठकीमध्ये सीबीएसई बोर्डाच्या बारावीच्या परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या बैठकीत CBSE बोर्डाच्या बारावीच्या परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
देशातील सध्याची कोरोनास्थिती आणि विद्यार्थ्यांच्या आरोग्याचा प्रश्न लक्षात घेता हा निर्णय घेण्याता आला. या निर्णयानंतर आता इयत्ता 12 वीच्या विद्यार्थ्यांच्या निकालावर काम केले जाणार आहे.
आढावा बैठकीनंतर – “मुलांचे आरोग्य आणि सुरक्षिततेला आम्ही महत्त्व दिले. मुलांच्या आरोग्याशी कोणत्याही परिस्थितीत तडजोड केली जाऊ शकत नाही. अशा तणावात मुलांना परीक्षा देण्याचे बंधन घालणे चुकीचे आहे. या प्रक्रियेशी संबंधित सर्वांनीच मुले व पालक तसेच शिक्षकांबद्दल संवेदनशील असायला हवे”, असं पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले.
CISCE ने केली परीक्षा रद्द केल्याची घोषणा:
आता CBSE बारावीच्या परीक्षा रद्द करण्यात आल्या. या निर्णयानंतर आता CISCE नेसुद्धा आपल्या 12 वीच्या परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेतला. यावेळी विद्यार्थ्यांचा निकाल कसा लावला जाणार याबाबत नेमका निर्णय झाला नसल्याचं सांगण्यात आला आहे. याविषयी लवकरच निर्णय घेतला जाणार असल्याचं CISCE बोर्डाने म्हटलं आहे.
दरम्यान , सीबीएसई बारावीच्या परीक्षा रद्द केल्याच्या निर्णयापाठोपाठ राज्य मंडळाच्या 12 वी परीक्षासुद्धा रद्द होण्याची दाट शक्यता आहे. तसे संकेत राज्याच्या शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी मंगळवारी दिले असून दोन दिवसांत याविषयी निर्णय होण्याची शक्यता आहे.