अभ्यासाच्या ओझ्याखाली दबलेल्या सहा वर्षांच्या एका चिमुकलीने थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडेच ‘होमवर्क’बाबत तक्रार केली. ‘मोदी साब..! लहान मुलांवर कामाचा इतका बोजा कशासाठी..?’ या तिच्या निरागस प्रश्नानंतर अवघ्या काही तासांत प्रशासन कामाला लागले.
कोरोनामुळे (corona) सध्या शाळा बंद असून, ‘ऑनलाइन क्लासेस’ (Online classes) सुरु आहेत. मात्र, काही तास चालणारे ऑनलाईन वर्ग आणि मोठ्या प्रमाणात दिला जाणारा गृहपाठ, याबद्दल जम्मू-काश्मीरमधील ही चिमुरडी नाराज होती. त्यावर तिने 1 मिनिट 11 सेकंदांचा व्हिडीओ बनवला.
Modi saab ko is baat par zaroor gaur farmana chahiye😂 pic.twitter.com/uFjvFGUisI
— Namrata Wakhloo (@NamrataWakhloo) May 29, 2021
Advertisement
व्हिडीओमध्ये चिमुकली म्हणते, की “मोदी साब, छोट्या मुलांवर कामाचं एवढं ओझं कशासाठी? इंग्रजी, गणित, उर्दू आणि ईव्हीएस हे विषय शिकवले जातात. त्यानंतर संगणक वर्ग असतो. इतकं जास्त काम असतं, मोठ्या मुलांसाठी…! छोट्या मुलांवर एवढा बोजा कशासाठी? आता काय करायचं..?”
दरम्यान, या चिमुकलीचा हा व्हिडीओ औरंगजेब नक्षबंदी याने सोशल मीडियावर (Social Media) शेअर केला नि अवघ्या काही वेळात तो मोठया प्रमाणात व्हायरल झाला. जम्मू-काश्मीरच्या लेफ्टनंट गव्हर्नरनी शालेय शिक्षण विभागाला याबाबत तातडीने लक्ष घालण्याचा आदेश दिला.
खूपच लाघवी तक्रार…!
जम्मू-काश्मीरच्या लेफ्टनंट गव्हर्नरनींही ‘ट्वीट’ (Twit) करीत म्हटलं, की ‘खूपच लाघवी तक्रार! शाळकरी मुलांवरील गृहपाठाचे ओझे कमी करण्यासाठी 48 तासांत नवे धोरण निश्चित करण्याचे आदेश शालेय शिक्षण विभागाला दिले आहेत. बालपणातील निरागसता ही देवाची देणगी आहे आणि त्यांचे दिवस चैतन्यशील आणि आनंदाने भरले जावेत..’