SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

कोरोनावरील उपचारासाठी सरकारकडून नवे दर जाहीर, जाणून घ्या तुमच्या शहरातील दर..!

कोरोनावरील उपचार घेताना दवाखान्याचे अव्वाच्या सव्वा बिल पाहूनच डोळे पांढरे होण्याची वेळ येत होती. त्यामुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी खासगी रुग्णालयांसाठी कोरोनावरील उपचाराचे दर निश्चित केले आहेत. शहरांचे वर्गीकरण करून हे दर निश्चित केले आहेत.

मुख्यमंत्री ठाकरे यांनी जिल्हाधिकारी व महापालिका आयुक्तांना या आदेशाची अंमलबजावणी करण्याचे निर्देश दिले आहेत. खासगी रुग्णालयातील 80 टक्के खाटांसाठी शासकीय दरानुसार, तर उर्वरित 20 टक्के खाटांसाठी खासगी रुग्णालयांनी निश्चित केलेल्या दरानुसार आकारण्याची परवानगी दिली होती. त्याची मुदत 31 मे रोजी संपली. त्यानंतर आज (1 जून) सरकारने पुन्हा अधिसूचना काढली.

Advertisement

शहरांच्या दर्जानुसार ‘अ’, ‘ब’, ‘क’ अशा गटात शहरांची विभागणी करण्यात आली आहे. त्यामुळे आता शहरी व ग्रामीण भागातील उपचारांचा दर वेगवेगळा असेल. ग्रामीण भागात कमी खर्चात उपचार मिळणार आहेत. रुग्ण दाखल करतानाच रुग्णालयाने पुर्वलेखापरीक्षीत देयक देणे बंधनकारक आहे. जास्त दर आकारणाऱ्या रुग्णालयांची भरारी पथकांमार्फत तपासणी व कारवाई केली जाणार आहे.

रुग्णालयांचे नवीन दर

Advertisement

वॉर्डमधील नियमित विलगीकरण (प्रति दिवस)

 •  ‘अ’ वर्ग शहरांसाठी 4 हजार रुपये
 •  ‘ब’ वर्ग शहरांसाठी 3 हजार रुपये
 •  ‘क’ वर्ग शहरांसाठी 2400 रुपये
  (आवश्यक देखरेख, नर्सिंग, चाचण्या, औषधी, बेड्सचा खर्च व जेवणाचा समावेश आहे. मोठ्या चाचण्या, तपासणी, उच्च पातळीवरील मोठी औषधी यातून वगळली आहेत.

  व्हेंटीलेटरसह आयसीयू व विलगीकरण
 •  ‘अ’ वर्ग शहरांसाठी 9000 रुपये,
 •  ‘ब’ वर्ग शहरांसाठी 6700 रुपये
 •  ‘क’ वर्ग शहरांसाठी 5400 रुपयेकेवळ आयसीयू व विलगीकरण:
 •  ‘अ’ वर्ग 7500 रुपये
 •  ‘ब’ वर्ग 5500 रुपये
 •  ‘क’ वर्ग 4500 रुपये

‘अ’ वर्गातील शहरे
मुंबई, महानगर क्षेत्र (भिवंडी, वसई-विरार वगळून), पुणे, पुणे महानगर क्षेत्र, नागपूर (नागपूर मनपा, दिगडोह, वाडी).

Advertisement

‘ब’ वर्ग शहरे
नाशिक, औरंगाबाद, अमरावती, भिवंडी, सोलापूर, कोल्हापूर, वसई-विरार, मालेगाव, नांदेड, सांगली

‘अ’ आणि ‘ब’ वर्ग शहरे सोडून इतर सर्व जिल्हा मुख्यालयांचा ‘क’ वर्गात समावेश केला आहे.

Advertisement

🎯 तमाम महाराष्ट्राला व्हॉट्सॲपवर न्यूज अपडेट्स पुरवणारे ‘स्प्रेडइट – डिजिटल न्यूजपेपर’ नक्की जॉईन करा 👉https://cutt.ly/impnews

Advertisement