SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

आजपासून आयकर, पीएफ, बँकेविषयी अनेक नियम बदलणार, ते कोणते? जाणून घेण्यासाठी सविस्तर वाचा..

आज 1 जून म्हणजेच महिन्याचा पहिला दिवस. 1 जून ही तारीख अनेक प्रकारे विशेष आहे. आजपासून बँक, आयकर, गुगल यासंबंधी अनेक नियम बदलत आहेत.

कोणते नियम बदलणार वाचा..

Advertisement

इनकम टॅक्स ई-फायलिंग वेब पोर्टल: आयकर विभाग पुढील महिन्यात करदात्यांसाठी नवीन वेब पोर्टल सुरू करणार आहे. 1 ते 6 जूनदरम्यान विद्यमान वेब पोर्टल सहा दिवस बंद असेल. यानंतर 7 जून रोजी नवीन ई-फायलिंग पोर्टल सुरू होणार आहे. आयकर विभागाकडून 7 जूनपासून करदात्यांसाठी नवं पोर्टल लाँच करत आहे. 7 जूनपासून www.incometaxgov.in हे नवं पोर्टल सुरू होणार आहे.

गूगल फोटोजचा स्पेस आता मोफत नाही: 1 जूननंतर गुगल फोटोजमध्ये (Google Photos) आधीचा 15 जीबी इतका फ्री स्पेस प्रत्येक युजरला देण्यात येईल. यामध्ये ईमेल, फोटो आणि गुगल ड्राईव्हचा समावेश आहे . तम्हाला 15 जीबीपेक्षा जास्त स्पेस वापरण्यासाठी Google One चं सब्सक्रिप्शन खरेदी करावं लागेल. यापूर्वी हा स्पेस मोफत वापरता येत होता.

Advertisement

पीएफ नियम: नव्या नियमानुसार, आता कंपनीला आपल्या कर्मचार्‍यांच्या खात्याला आधार कार्डशी लिंक करावे लागेल. प्रत्येक खातेधारकाचं पीएफ खातं आधारशी लिंक केलं जाणं अनिवार्य आहे. हा नियम 1 जूनपासून लागू असेल. जर पीएफ खाते आधारशी (Adhar Card Linking) जोडलेले नसेल तर कंपनीकडून पीएफमध्ये सामील होणारी रक्कम थांबू शकेल. कंपनीकडून असं न केलं गेल्यास सब्सक्रायबरच्या खात्यात कंपनीचं योगदान थांबवलं जाऊ शकतं.

बँक ऑफ बडोदामध्ये पॉझिटीव्ह पे सिस्टीम (Positive Pay System): बँक ऑफ बडोदाच्या खातेधारकांसाठी आजपासून चेक अर्थात धनादेशानं पेमेंट करण्याच्या पद्धतीत बदल होणार आहे. फसवी चेक रक्कम लक्षात घेता पॉझिटिव्ह पे कन्फर्मेशन लागू केले जात आहे याचा फायदा घेण्यासाठी प्रथम बँकेकडून (Bank of Baroda) खातरजमा होणे आवश्यक आहे. ग्राहक बँकेला काही काही महत्त्वाची माहिती देईल, तरच ही सुविधा उपलब्ध होईल. ही माहिती एसएमएस, इंटरनेट बँकिंग, एटीएम (SMS, Internet Banking, ATM) वगैरे इ. च्या माध्यमातून देऊ शकतो.

Advertisement

YouTube च्या माध्यमातून कमाई करणाऱ्यांना द्यावा लागणार कर: युट्यूबने आता अमेरिकेच्या बाहेरील YouTube क्रिएटर्सकडून कर वसूल करण्याचा निर्णय घेतला आहे. ज्यांच्या चॅनल अथवा व्हीडीओला अमेरिकन व्ह्यूअर्स मिळाले आहेत आणि त्यांच्या माध्यमातून जे पैसे मिळाले आहेत, त्यावर करस्वरुपात काही कर भरावा लागणार आहे. या क्रिएटर्सना अमेरिकेतून मिळालेल्या व्ह्यूजवर कर भरावा लागेल.

सिंडिकेट बँकेचे आयएफएससी कोड बदलणार: कॅनरा बँकेने (Canara Bank) दिलेल्या माहितीनुसार, सिंडिकेट बँकेच्या ग्राहकांचे जुने आयएफएससी कोड 1 जुलैपर्यंत वैध राहतील, कारण कॅनरा बँकेत सिंडिकेट बँकेचे विलीनीकरण झाल्यावर सिंडिकेट बँकेच्या सर्व शाखांचे आयएफएससी कोडही बदलले आहेत. त्यामुळे ग्राहकांनी 30 जूनपर्यंत IFSC कोड अपडेट करावे, अशी सूचना केली आहे.

Advertisement

देशांतर्गत हवाई प्रवास महागला: भारतात हवाई वाहतूक, विमान प्रवास 13 टक्क्यांपासून 16 टक्क्यांपर्यंत वाढणार असल्याची माहीती आहे. केंद्र सरकारच्या माहितीनुसार जिथे प्रवासाला 40 मिनिटे लागतात, अशा प्रवासाला कमीत कमी भाडं 2300 वरुन 2600 रुपये करण्यात आलं आहे. तर, 46 ते 60 मिनिटांसाठी प्रवासाला भाडं 2900 वरुन 3300 इतकं केलं आहे.

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
💁🏻‍♀️ आता WhatsApp वर मिळवा ताज्या बातम्या, जॉब अपडेट्स आणि माहिती मनोरंजन🆓 त्यासाठी क्लिक करा 👉 https://cutt.ly/Spreadit4u

Advertisement