SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

सोन्याच्या भावात वाढ, चांदीही वधारली, जाणून घ्या तुमच्या शहरातील बाजारभाव..!

गेल्या वर्षी ऑगस्टमध्ये सोन्याच्या भावाने प्रती 10 ग्रॅमसाठी 56 हजार रुपयांचा विक्रमी आकडा गाठला होता. त्यानंतर त्यात मोठी घसरण झाली. आता पुन्हा एकदा सोन्याच्या दरात वाढ होताना दिसत आहे.

महाराष्ट्रातील काही शहरात सोन्या-चांदीच्या किमतींत (Gold Silver Rate) मोठी दरवाढ झाल्याचे दिसत आहे. काही ठिकाणी तर सोन्याने पुन्हा एकदा प्रति 10 ग्रॅम 50 हजाराचा आकडा पार केला आहे. तसेच चांदीची किंमत ही प्रतिकिलो 70 हजारांच्या आसपास दिसत आहे.

Advertisement

दरम्यान, जागतिक बाजारपेठेत झालेल्या सकारात्मक बदलानंतर आठवड्याच्या पहिल्या दिवशी आज (सोमवारी) मल्टी कमोडिटी एक्सचेंज (MCX) वर सोन्याचा भाव (Gold Price) प्रति 10 ग्रॅम 0.25 टक्क्यांनी वधारले. MCX वर चांदीची किंमत 425 रुपयांनी वाढून 72,036 प्रतिकिलो झाली.

देशभरात या महिन्यात सोन्याची किंमत आतापर्यंत तोळ्यामागे 2,000 रुपयांनी वाढल्याचे दिसत आहे. सोमवारी सोन्याचा दर 120 रुपयांनी वाढला. त्यामुळे प्रति 10 ग्रॅम 48,662 रुपये सोने झाले होते. आंतरराष्ट्रीय बाजारातही सोन्याची किंमत प्रति औंस 1,900 डॉलर इतकी आहे.

Advertisement

महत्वाच्या शहरातील बाजारभाव

 • पुणे
  सोने – 49,500 ( प्रति तोळा )
  चांदी – 71000 ( प्रति किलो )
 • अहमदनगर / शिर्डी
  सोने – 48600 प्रति तोळा
  चांदी- 75000 प्रति किलो
 • नाशिक
  सोने – 48,150 (24 कॅरेट)
  चांदी – 73500(प्रति किलो)
 • कोल्हापूर
  सोने – 50,200 प्रति तोळा
  चांदी- 72,500 प्रति किलो

न्यूयॉर्कच्या कमोडिटी एक्सचेंजवर (Commodity Exchange) सोन्याची स्पॉट किंमत आज किरकोळ कमी झाली. यूएस यील्डमध्ये वाढ झाली. त्यामुळे आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याची किंमत कमी होत असल्याचे निरीक्षण एचडीएफसी सिक्युरिटीजचे वरिष्ठ विश्लेषक (कमोडिटीज) तपन पटेल यांनी नोंदविले आहे.

Advertisement

🎯 तमाम महाराष्ट्राला व्हॉट्सॲपवर न्यूज अपडेट्स पुरवणारे ‘स्प्रेडइट – डिजिटल न्यूजपेपर’ नक्की जॉईन करा 👉https://cutt.ly/Spreadit4u

Advertisement