SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

महाराष्ट्रात आणखी 15 दिवस निर्बंध राहणार.. उद्धव ठाकरे यांची घोषणा

“महाराष्ट्रात पुढील 15 दिवसांसाठी (15 जूनपर्यंत) निर्बंध कायम राहणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज केली. तसेच “कोरोनामुक्त गाव’ योजना राबविणार असल्याचेही ठाकरे यांनी सांगितले

मुख्यमंत्री ठाकरे म्हणाले की, “तौक्ते चक्रीवादळाची मिनिटा-मिनाटाला माहिती घेतली. किनारपट्टीवर कायमस्वरुपी उपायोजना करण्याची गरज आहे. वादळामध्ये वीज खंडित होते. झाडे उन्मळून पडतात. या गोष्टीचा विचार करुन विजेचा पुरवठा भूमीगत करावा लागेल. तसेच काही घरे भूकंपरोधित बांधावे लागतील. याबाबत केंद्र सरकारशी बोलणे सुरु केले आहे. मला खात्री आहे केंद्र आपल्याला या बाबतीत मदत करेल.”

Advertisement

“ऑक्सिजनची गरज मध्यंतरी वाढली होती. उद्योगांचा ऑक्सिजन मागवुनही टंचाई जाणवत होती. आता काळी बुरशी आली आहे. राज्यात म्युकर मायकोसिसचे 3000 हजार रुग्ण आहेत. बालरोगतज्ज्ञाचे टास्क फोर्स तयार केले आहेत,” असे ते म्हणाले.

ठाकरे म्हणाले, की “45 वर्षावरील लोकांच्या लसीकरणाची जबाबदारी केंद्राने घेतली आहे, तर 18 ते 44 वर्षावरील नागरिकांची जबाबदारी राज्याची आहे. जूनपासून लस पुरवठा वाढणार असल्याचे सांगितले आहे. आतापर्यंत सव्वा दोन कोटी नागरिकांचे लसीकरण पूर्ण केले आहे.”

Advertisement

दहावीच्या परीक्षा न घेता मुल्याकंन करणार आहोत. बारावीच्या परिक्षेबाबत लवकरच निर्णय घेणार आहोत. मात्र, याबाबत केंद्रानेही देशासाठी एकच धोरण घेतले पाहिजे. त्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशीही बोलू.

महत्वाचे मुद्दे

Advertisement

कोरोनामुक्त गाव मोहीम राबविणार. त्यासाठी पोपटराव पवार यांच्याशी चर्चा करू.

खरीप हंगामाच्या पार्श्वभूमीवर शेतीची कामे करताना कोरोनाची बंधने पाळा.

Advertisement

कोरोनात अनेक बालके अनाथ झाली आहेत. त्यांच्यासाठी केंद्राने योजना जाहीर केली आहे. या बालकाचे पालकत्व सरकार घेईल. या बालकांसाठी लवकरच योजना जाहीर करू.

🎯 तमाम महाराष्ट्राला व्हॉट्सॲपवर न्यूज अपडेट्स पुरवणारे ‘स्प्रेडइट – डिजिटल न्यूजपेपर’ नक्की जॉईन करा 👉https://cutt.ly/Spreadit4u

Advertisement