SpreadIt News | Digital Newspaper

मोबाईल हरवला किंवा चोरी गेला तरी मोबाईलमधील सगळ्या गोष्टी ऑनलाईन डिलीट करता येणार, कसं ते तुम्हीच वाचा..

0

भारतात रोजच कुठे ना कुठे मोबाईल (Mobile) रोज चोरीला जातात. मोबाईल चोरणारे हे मोबाईल चोर एकदा चोरी केल्यावर मोबाइलचं काय करतील आणि त्यातील सिम कार्डचा गैरवापर तर करणार नाहीत ना किंवा सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे फोनमधील डेटाचा (Data) गैरवापर तर होणार नाही ना? असं टेंशन वाढतं.

आपल्या मोबाईल फोनमध्ये वा स्मार्टफोनमध्ये महत्वाच्या फाईल्स, फॅमिली फोटो असतात, खासगी फोटो असतात, ई-मेल लॉग इन असतो, यूपीआयद्वारे व्यवहार (UPI) करण्यासाठी ॲप्स असतात ज्यात बँक अकाऊंट (Bank Account) लिंक असते, असा अनेक महत्वाचा डेटा आपल्या मोबाईलमध्ये असतो आणि याचा जर का एकदाही स्मार्ट पद्धतीने गैरवापर झाला, तर आपलं खूप नुकसान होणं हे ठरलेलंच!

Advertisement

काही ऑडिओ, व्हिडिओही असतात जे व्हायरल होऊ शकतात. गैरवापर करुन व्हायरल तर होणार नाही ना याची चिंता असते. मग मोबाईल चोरीला गेल्यावर तुम्ही तुमचा डेटा डिलिट करु शकता.

ऑनलाईन डेटा डिलिट करण्यासाठी काय करायचं वाचा..

Advertisement

जर तुमचा स्मार्टफोन चोरी झाला तर त्यातील डेटा तुम्ही ऑनलाईट डिलिट करु शकता, तोही तुमचा फोन जवळ नसतानाही!

मग करायचं काय? तर फक्त सर्वात आधी तुम्ही कॉम्प्युटर किंवा दुसऱ्या कुणाच्याही फोनवरुन इंटनेट ब्राऊझर ओपन करून पुढील लिंक ओपन करा 👉https://www.google.com/android/find

Advertisement

मग तुम्ही तुमच्या ई-मेल (Email) आयडीने लॉगिन करा. हाच लॉगिन आयडी तुमच्या हरवलेल्या व चोरी गेलेल्या मोबाईलमध्येही असायला हवा.

आता तुम्हाला समोर 3 पर्याय दिसतील

Advertisement

▪️ प्ले साऊंड – (Play Sound) तुमच्या मोबाईलची सायलेंट किंवा व्हायब्रेट मोडवर असतानाही 5 मिनिटांसाठी रिंग वाजवू शकता),

▪️ सिक्युअर डिवाईस – (Secure Device) तुम्ही तुमचा मोबाईल लॉक करू शकता, पिन/पॅटर्न/नवीन पिन सेट करू शकता किंवा बदलू शकता. लॉक स्क्रीनवर तुम्ही तुमचा एखादा फोन नंबर टाकू शकता, जेणेकरून तो मोबाईल ज्याला कुणाला मिळेल तो तुम्हाला संपर्क करेल.

Advertisement

▪️ इरेज डिवाईस – (Erase Device) मोबाईलवरचा डेटा कायमस्वरूपी डिलीट करू शकता.

त्यानुसार फोनचा डेटा डिलिट करण्यासाठी तुम्हाला ERASE DEVICE या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे आणि पुन्हा एकदा क्लिक केल्यानंतर तुम्हाला तुमचा ई-मेल पासवर्ड टाकावा लागेल.

Advertisement

आता फोनमध्ये इंटरनेट चालू असेल तर तुमचा सर्व डेटा डिलिट करु शकाल. मग काय इतकं सोपं होतं हे..!

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
🎯 तमाम महाराष्ट्राला व्हॉट्सॲपवर न्यूज अपडेट्स पुरवणारे ‘स्प्रेडइट – डिजिटल न्यूजपेपर’ नक्की जॉईन करा 👉https://cutt.ly/Spreadit4u

Advertisement

 

 

Advertisement