SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

बिर्याणीत ‘लेग पिस’ नसल्याने गड्याने केली थेट मंत्र्यांकडे तक्रार.. पहा मंत्र्यांनी काय उत्तर दिले.?

सध्या ऑनलाइनद्वारे (Online) खाद्यपदार्थ मागविण्याची फॅड (Fad) वाढले आहे. मात्र, त्यात बऱ्याचदा आपल्याला मनपसंद पदार्थ येत नाहीत. मग आपण त्रागा करून ही गोष्ट सोडून देतो किंवा फारतर संबंधित कंपनीकडे तक्रार करतो. मात्र, मनाजोगती ‘ऑर्डर’ (Order) न आल्याने एका पठ्ठयाने चक्क मंत्र्यांकडे तक्रार केली.

तेलंगणा (Telangana) राज्यात नुकताच हा प्रकार समोर आला. या राज्याचे नागरी प्रशासन आणि शहर विकास मंत्री आहेत, के. टी. रामा राव. त्यांच्यावर माहिती-तंत्रज्ञान विभागाचीही जबाबदारी आहे. केटीआर (KTR) या नावाने ते प्रसिद्ध आहेत.

Advertisement

राज्यातल्या लोकांच्या अडचणी सोडविण्यासाठी ते सतत ‘ट्विटर’ (Twitter)वर ‘ऍक्टिव्ह’ असतात. त्यामुळे तेलंगणातील नागरिकही ‘ट्विटर’वर आपल्या अडचणी मांडतात आणि ‘केटीआर’ही त्याची दखल घेतात.

तेलंगणातील थोटाकुरी रघुपती नावाच्या सद्गृहस्थाने ‘झोमॅटो’वर ‘चिकन बिर्याणी’ मागविली. मात्र, ती मनासारखी न आल्याने त्याने ट्विट केले. ‘मी एक्स्ट्रा मसाला आणि लेग पीससह चिकन बिर्याणी ऑर्डर केली; पण मला दोन्हीही मिळालं नाही. लोकांना ‘सर्व्ह’ करायची ही पद्धत आहे का?’ असं लिहून त्याने हे ट्विट ‘झोमॅटो’सह मंत्री केटीआर यांनाही टॅग (Tag) केलं.

Advertisement

केटीआर यांनी त्या ट्विटची दखल घेत, ‘भावा, मला हे ट्विट टॅग करण्याचं कारण काय? मी नेमकं काय करणे अपेक्षित आहे?’ असा प्रतिसवाल केला. केटीआर यांचा रिप्लाय पाहून त्याने आपलं ट्विटर अकाउंटच डिलीट केलं; पण तोपर्यंत हा रिप्लाय व्हायरल झाला होता.

🎯 तमाम महाराष्ट्राला व्हॉट्सॲपवर न्यूज अपडेट्स पुरवणारे ‘स्प्रेडइट – डिजिटल न्यूजपेपर’ नक्की जॉईन करा 👉https://cutt.ly/Spreadit4u

Advertisement